national-drink-tea |
राष्ट्रीय पेय चहा आणि महाराष्ट्र
आपल्या राज्यात चहा पिकत नाही, पण जर स्ट्रॉबेरी, सफरचंद, विविध प्रकारच्या परदेशी भाज्या, परदेशी फुले आदींची शेती जर आपल्या राज्यात यशस्वीपणे होऊ शकते तर चहाची का नाही? चहाबाबत उपलब्ध आकडेवारी जर अभ्यासली तर राज्यातील शेतकर्यांच्या मनात चहाची शेती करण्याचा विचार नक्कीच येणार.
या लेखातील महत्त्वाचे मुद्दे
- भारतातील चहाचे प्रकार
- भारतीयांची चहा पिण्याची आकडेवारी
- आसाम टी प्लांटर्स असोसिएशन
- चहाची लागवड
- महाराष्ट्रातील चहाची शेती
- चहाची शेती आणि कृषी विभाग
- निष्कर्ष
भारतातील चहाचे प्रकार । Types of tea in India
- आसाम चहा (Assam Tea) : आसाम, ईशान्य भारतात आसाम चाची लागवड केली जाते. या चहाला स्ट्रॉंग आणि माल्टी चव असते. आसाम चहा त्याच्या गडद रंगासाठी ओळखला जातो.
- दार्जिलिंग चहा (Darjeeling Tea): या चहाची भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग येथे काग्वाद केली जाते. अनेकदा "चहाची शॅम्पेन" म्हणून दार्जिलिंग चहाला संबोधले जाते. दार्जिलिंग चहाला हलका, सोनेरी रंगाचा डेलिकेट, फुलांचा स्वाद आणि मस्कॅटल चव ( muscatel flavor) असते.
- निलगिरी चहा (Nilgiri Tea) : तामिळनाडू आणि केरळच्या दक्षिणेकडील राज्यांमधील निलगिरी टेकड्या येथे निलगिरी चहाची लागवड होते. निलगिरी चहाला सामान्यतः तेजस्वी, सुगंधी आणि संतुलित चव असतो.
- कांगडा चहा (Kangra Tea) : हिमाचल प्रदेश राज्यातील कांगडा खोरे येथे कांगडा चहाची लागवड होते. हा चहा हलक्या आणि तेज चवीसाठी (light and brisk flavor) ओळखला जातो.
- आसाम ऑर्थोडॉक्स चहा (Assam Orthodox Tea) : आसाम राज्यात या चहाची लागवड होते. आसाम ऑर्थोडॉक्स चहा स्टॅंडर्ड आसाम सीटीसी (क्रश, टीयर, कर्ल) चहापेक्षा भिन्न असतो आणि हा चहा अधिक पारंपारिक प्रक्रिया पद्धतीतून जातो.
- सिक्कीम चहा (Sikkim Tea) : सिक्कीम, ईशान्य भारतातील एक राज्य या प्रदेशात या चहाची लागवड होते. सिक्कीम चहा त्यांच्या फुलांच्या आणि फ्रूटी नोट्ससाठी ओळखला जातो. सिक्कीम चहाला सहसा प्रीमियम चहा मानले जाते.
- मसाला चाय (Masala Chai): वेलची, दालचिनी, आले आणि लवंगा यांसारख्या मसाल्यांच्या मिश्रणासह ब्लॅक टी म्हणून या चहाचे सेवन होते. मसाला चाय भारतभर लोकप्रिय आहे. या चहाला अनेक ठिकाणी दुधात तयार केले जाते आणि चवीनुसार गोड केले जाते.
- हिरवा चहा (Green Tea) : दार्जिलिंग, आसाम आणि निलगिरी टेकड्यांसह विविध प्रदेशात या चहाची लागवड होते. भारतातील ग्रीन टी विविध शैलींमध्ये उपलब्ध आहे.
- पांढरा चहा(White Tea):- दार्जिलिंग आणि निलगिरी सारख्या प्रदेशात या चहाची लागवड होते. या चहावर कमीतकमी प्रक्रिया केली जाते. हा चहा त्याच्या subtle taste and light color ओळखले जातो.
भारतीयांची चहा पिण्याची आकडेवारी | Tea drinking statistics of Indians
सध्या चहा उत्पादनात आपला देश जगात दुसर्या क्रमांकावर आहे. दिवसेंदिवस भारतीयांमध्ये चहा सेवनाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. भारतीयांच्या या चहाप्रेमामुळे चहा उद्योगाला आता सोन्याचे दिवस आल आहते, कारण गेल्या पाच वर्षापासून सातत्याने १४ ते १५ हजार कोटींच्या आर्थिक उलाढालीत घुटमळणार्या या उद्योगाने नुकताच २० हजार कोटी रूपयांच्या उलाढालीचा टप्पा पार केला आहे. ओद्यागिक संघटना असोचेम नुसार चहा उद्योगातील ही वाढ वर्षाकाठी २० टक्क्यांनी होत असून २०१५ पर्यंत हा उद्योग तब्बल ३३ हजार कोटी रूपयांच्या घरात जाऊ शकतो. भारतीय लोक आता ग्रीन टी, ब्लॅक टी आणि आइड् टी अशा विविध प्रकारच्या स्वादांमधील चहालाही उत्तम पसंदी देऊ लागले आहेत. त्यामुळे चहा पिण्याच्या प्रमाणात सुमारे १२ टक्क्यांनी वाढ होत आहे.
आसाम टी प्लांटर्स असोसिएशन | Assam Tea Planters Association
भारतात चहाला इतकी पसंती मिळाली आहे की सध्या भारतातील ८३ टक्के घरांमध्ये चहाचा वापर होतो. त्यामुळे भारतात पाण्यानंतर सगळ्यात स्वस्त पेय म्हणून चहाकडेच बघितले जाते. भारतीय लोकांचे अशा प्रकारे चहावरील प्रेम पाहता आता चहाला भारताचे राष्ट्रीय पेय होण्याचा मान मिळणार आहे. पुढच्यावर्षी १७ एप्रिल, २०१३ ला ही घोषणा होणार आहे. आसाम टी प्लांटर्स असोसिएशनच्या ( Assam Tea Planters Association) ७५ व्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात योजना आयोगाचे उपाध्यक्ष मोंटेक सिंग अहलूवालिया यांनी ही माहिती दिली आहे. १७ एप्रिल २०१३ ही आसामी चहाच्या पहिल्या उत्पादक आणि स्वातंत्र्य सेनानी मणिराम दिवाण यांची २१२वी जयती आहे, त्यामुळेच सरकारने या खास घोषणेसाठी त्या दिवसाची निवड केली आहे. चहाला राष्ट्रीय पेय घोषीत करण्यामागे अनेक कारणे आहेत. संघटित श्रमाच्या क्षेत्रात चहा सर्वात जास्त रोजगार देणारा आहे. विशेष म्हणजे त्यातली निम्मी संख्या महिलांची आहे.
चहाबाबत खालील आकडेवारी आपण जाणून घेणे महत्वाचे आहे-
- अल्कोहोलरहित पेयांच्या सेवनात देशात सर्वाधिक पसंती ही सध्या चहालाच आहे.
- जगात होणार्या एकूण उत्पादनाच्या ३० टक्के चहाचे उत्पादन भारतात होत आहे.
- चहा उत्पादनात जगात चीन पहिला तर भारत दुसर्या स्थानावर आहे.
- चहाच्या बाबतीत भारत चौथ्या क्रमांकाचा निर्यातदार देश आहे.
- भारतात दरवर्षी सरासरी ९६६.४० मिलियन किलो चहाचे उत्पादन होते. यापैकी ८० टक्के चहा देशातच खपतो.
- आपल्या देशात ६ लाख जमिनीवर चहाची शेती केली जाते. सुमारे १५००० शेतकरी ही चहाची शेती करीत असून ३५ लाख लोकांना त्यामुळे रोजगार मिळतो.
- आपल्या देशात ब्रॅण्डेड आणि नॉन ब्रॅण्डेड अशा दोन्ही प्रकारच्या चहाची उलाढाल फार मोठी आहे. परंतु एकूण चहाच्या तुलनेत ५५ टक्के वाटा हा ब्रॅण्डेड चहाचा आहे.
- भारतीय दरडोई चहाचा वापर ८०० ग्रॅम चहा प्रतिवर्ष असा आहे.
चहाची लागवड | Tea plantation
भारतात चहाची लागवड मुख्यत्वेकरून उत्तर व दक्षिण भारतातील डोंगराळ भागात केली जाते. आसाम हा चहाच्या लागवडीमध्ये प्रथमपासूनच अग्रेसर प्रदेश आहे. त्या राज्यातील ब्रह्मपुत्रा आणि सुरमा या नद्यांच्या खोर्यातील प्रदेश आणि प. बंगालमधील दार्जिलिंग, जलपैगुरी,कुचबिहार आणि तराई हे उ. भारतातील चहाच्या लागवडीचे प्रमुख प्रदेश आहेत. तमिळनाडू आणि केरळमध्ये सुद्धा चहाच्या मळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. विशिष्ट अपवाद वगळता महाराष्ट्रात सर्व तृणधान्य, कडधान्य, फळे, फुले आणि भाजीपाल्याची पिके ( Cereals, pulses, fruits, flowers and vegetable crops ) यशस्वीपणे घेतली जातात. जी पीके पुर्वी महाराष्ट्रात घेणे शक्य नव्हते, अशी पिके ग्रीन हाउसमुळे आता यशस्वीपणे आणि तीसुद्धा वर्षभर घेतली जात आहे. मग सर्वसामान्य लोकांना प्रश्न असा पडतोे की जेथे चहा भारतातील राष्ट्रीय पेय होण्याच्या मार्गावर आहे, अशी चहाची शेती महाराष्ट्रात घेण्याविषयी आतापर्यंत व्यावसायिक प्रयत्न का झाले नाहीत?
महाराष्ट्रातील चहाची शेती | Tea Farming in Maharashtra
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातर चहाची शेती गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. तेथे श्री. टेकावडे यांनी सह्याद्रीच्या पठारावर ४० एकर जमिनीवर चहाचा मळा फुलविला आहे. महाराष्ट्रात चहा होऊ शकत नाही असे नेहमीच सांगणारे टी बोर्डाचे अधिकारी देखील ही चहाची शेती बघून अंचबित झाले होते. श्री. टेकावडे यांच्यामते निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थांनी युक्त, कॅल्शीयमचे प्रमाण कमी पण लोह आणि मॅगनिजयुक्त अशी जमीन ( Drainage, rich in organic matter, low in calcium but rich in iron and manganese ) चहाचे पीक घेण्यास उत्तम असते. चहासाठी जमिनीतील जस्ताचे प्रमाणही महत्त्वाचे आहे. यासाठी मातीपरीक्षण होणे महत्त्वाचे आहे. झिंक सल्फेटच्या ४.४ किलो प्रतीएकरच्या फवारणीमुळे जस्ताची कमतरता कमी करता येते. महाराष्ट्र सरकारने चहा पिकाचे आर्थिक महत्त्व ओळखून गेल्या काही वर्षांत राज्यात चहा पिकविण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन तेथे चहाची लागवड करण्याचा निर्णय गेल्या वर्षीच कृषी विभागाने घेतला आहे.
पहिल्या टप्प्यात याठिकाणी ५० हेक्टर क्षेत्रावर चहाची लागवड केली जाणार आहे. महाबळेश्वर तालुक्यात सरासरी पर्जन्यमान ६१६५ मि.मी. आहे. पठारी प्रदेशावर हवामान थंड व कोरडे तर पावसाळ्यामध्ये आद्रतायुक्त आहे. असे हवामान चहास पोषक असते. चहा पिकासाठी अंशत: उष्ण व दमट हवामान ( Partly hot and humid climate ) लागते. तसेच हे पिक पाण्याचा उत्तम निचरा होणार्या पर्वतीय उंचीच्या प्रदेशातील सुपिक जमिनीत चांगले येते. ही सर्व परिस्थिती महाबळेश्वरमध्ये असल्याने राज्याच्या कृषी विभागाने येथे चहा लागवडस प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. येत्या २ ते ३ वर्षात ५० हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष चहाची लागवड करण्यात येणार आहे. चहासाठी प्रति एकरी होणार्या ३ लाख ४४ हजार रूपये खर्चापैकी ८० हजार रूपये सरकारी अनुदान म्हणून देण्याचे सरकारचे नियोजन आहे.
चहाची शेती आणि कृषी विभाग | Department of Tea Farming and Agriculture
चहा हे राष्ट्रीय पेय होणारच आहे, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा चहाच्या शेतीकडे गंभीरतेनेबघितले पाहिजे आणि येत्या वर्षापासून चहाच्या शेतीवर अधिकृतपणे प्रयोग सूरू करून महाराष्ट्रात चांगले उत्पादन देणार्या चहाच्या जाती कशा विकसित करता येतील, याकडे विशेष लक्ष्य दिले पाहिजे.
हे सुद्धा वाचा-