शेतकऱ्यांसाठी प्रेरक कार्यक्रम
नफ्या -तोट्याचा विचार न करता, अतिशय मेहनतीने आपल्यासाठी धान्य पिकविणार्या शेतकर्यांचे सत्कार करण्याची उदाहरणे मात्र फारच कमी आहेत. प्रचंड मेहनत घेऊन, दुष्काळाचा सामना करत धान्य पिकविणार्या शेतकर्याच्या पाठीवर शाबासकीचा हात देऊन त्यांच्यामध्ये नवी उमेद जागृत करण्याचा एक चांगला प्रयत्न मात्र धुळे जिल्ह्यात उत्तमप्रकारे यशस्वी झाला.
या लेखातील महत्त्वाचे मुद्दे
- एमपीएसस्सी, यूपीएसस्सी अधिकाऱ्यांचे सत्कार
- शेतकऱ्यांचा सत्कार
- शेतकऱ्यांच्या समस्या
- निष्कर्ष
भारतीय शेतकऱ्यांची शेती । Agriculture of Indian farmers
- भारतीय शेतकऱ्यांची कृषी पद्धती: अनेक भारतीय शेतकरी पारंपारिक शेती करतात. पिकांची निवड हवामान, माती आणि पाण्याची उपलब्धता या घटकांवर शेती अवलंबून असते. काही शेतकरी आधुनिक शेती तंत्र आणि तंत्रज्ञान वापरतात, तर काही जुन्या पद्धतींवरच अवलंबून असतात.
- शेतकऱ्यांची जमीन मालकी- मर्यादित जमीन असलेल्या छोट्या आणि सीमांत शेतकर्यांपासून ते मोठ्या जमीनमालकांपर्यंत जमीनधारणेचा आकार मोठ्या प्रमाणात बदलतो. वाटे हिस्से करतांना जमिनीचे तुकडे करणे ही एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे लहान शेतीवर अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.
- मान्सूनचे अवलंबन: भारतीय शेती पावसावर आधारित आहे, ज्यामुळे शेतकरी मान्सूनच्या पावसावर जास्त अवलंबून आहेत. अनियमित किंवा अपुऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान होते आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानावर परिणाम होतो.
- शेतकऱ्यांना आर्थिक आव्हाने: शेतीसाठी कर्ज, उच्च-व्याजदर,बाजारातील चढउतार आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतीचे नुकसान शेतकऱ्यांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो. अशा प्रकारे कर्ज यांचा समावेश आहे.
- भारतीय बाजार प्रवेश आणि किंमती: शेतकर्यांना दरवर्षी योग्य भाव असतांना बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यात आव्हानांना सामोरे जावे लागते. तसेच बाजारपेठेत मध्यस्थांच्या साखळीमुळे शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न कमी होऊ शकते.
- भारतीय सरकारी धोरणे: सरकारी धोरणे आणि कार्यक्रम शेतकऱ्यांचे जीवन घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. सबसिडी, कर्जमाफी आणि कृषी सहाय्य योजनांचा उद्देश शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करणे आहे, परंतु गरजू शेतऱ्यांपर्यंत सरकारी योजना पोहचणे आणि त्यांनी वेळेत या योजनांचा लाभ घेणे हे प्रत्येक वेळेस शक्य होतेच असे नाही.
- तंत्रज्ञानाचा अवलंब: अनेक शेतकऱ्यांनी सुधारित बियाणे, खते आणि यंत्रसामग्रीसह आधुनिक कृषी तंत्रज्ञान स्वीकारले आहे, ज्यामुळे उत्पादकता वाढली आहे. मात्र यासाठी मोठा खर्च करावा लागतो आणि यामुळे शेतमाल उत्पन्न वाढले तरी योग्य बाजारभाव मिळेल याची खात्री नसते.
भारतीय शेतकर्यांना भेडसावणार्या आव्हानांना तोंड देण्यासाठी, कृषी पद्धती सुधारण्यासाठी आणि शेतीमध्ये गुंतलेल्यांचे सर्वांगीण कल्याण करण्यासाठी सरकारी, गैर-सरकारी संस्था आणि इतर संस्थांद्वारे प्रयत्न केले जात आहेत. हे खरे असले तरी अनियमित पाऊस, बाजारभावातील चढउतार आणि शेतकऱ्यांचे कर्ज या सर्व संकटांचा सामान करीत शेतकरी सर्वांसाठी अन्न पिकवीत असतो. अशा या शेतकऱ्यांचे कौतुक झालेच पाहिजे. कुणालातरी आपल्या कष्टांची जाणीव आहे ही भावना खूपच आधार देते. शेतकऱ्यांचा सत्कार कुणी केला आणि त्यामागे हेतू काय होता, याबाबत सदर लेखात माहिते देण्यात आली आहे.
एमपीएसस्सी, यूपीएसस्सी अधिकाऱ्यांचे सत्कार | MPSSC, UPSSC officers felicitated
एमपीएसस्सी, यूपीएसस्सी आदी परीक्षांमध्ये अधिकारी बनल्यावर मुला-मुलींचे होणारे सत्कार आपण ऐकले आहेत. तसेच दहावी आणि बारावीमध्ये विशेष प्राविण्य मिळविणार्या विद्यार्थ्यांचेही सत्कार होत असतात. खेळ स्पर्धेत किंवा निवडणूका जिंकल्यावर यशस्वी उमेदवारांचे सत्कारही अनेक जणांनी प्रत्यक्ष पाहिले असतील. परंतु नफ्या -तोट्याचा विचार न करता, अतिशय मेहनतीने आपल्यासाठी धान्य पिकविणार्या शेतकर्यांचे सत्कार करण्याची उदाहरणे मात्र फारच कमी आहेत. प्रचंड मेहनत घेऊन, दुष्काळाचा सामना करत धान्य पिकविणार्या शेतकर्याच्या पाठीवर शाबासकीचा हात देऊन त्यांच्यामध्ये नवी उमेद जागृत करण्याचा एक चांगला प्रयत्न मात्र धुळे जिल्ह्यात उत्तमप्रकारे यशस्वी झाला. या कार्यक्रमाची दखल सर्व जिल्ह्यांनी घेतली असून सर्वांनी त्याचे स्वागत केले आहे.
शेतकऱ्यांचा सत्कार | Honoring the farmers
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच धुळे जिल्ह्यातील ३२ कृतिशील शेतकर्यांचा सन्मान २०१३ या वर्षी करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाष देवरे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कृषी सभापती, शिक्षण सभापती, महिला व बाल कल्याण सभापती, जिल्हा परिषद सदस्य, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी असे अनेक मान्यवर उपस्थित होते. शेतीबरोबर पुरक जोडधंदे करून उत्पादनात वाढ करून नाविन्यपूर्ण शेती करणार्या शेतकर्यांची धुळे जिल्ह्यातून निवड करण्यात आली होती. या कार्यक्रमात निवडक ३२ शेतकर्यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, साडी-चोळी देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात केवळ मान्यवरांनींच भाषणे केली असे नव्हे तर सन्मानित शेतकर्यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी त्यांच्या शेतीत राबविलेल्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. काही शेतकर्यांनी फळबाग, फुलशेती, कापूस सुधारित तंत्र, पशुसंवर्धन , पक्षिपालन, भाजीपाला पिकाचे व्यवस्थापन यासंदर्भात माहिती दिली. शेतकर्यांच्या मनोगतातून ते खरोखरच उद्यमशील शेतकरी आहेत, याचा परिचय सर्वांना झाला. यावेळी सत्कार झालेल्या शेतकर्यांनी सद्य:स्थितीत शेती व्यवसायासमोरील आव्हानांसंदर्भात चर्चा केली. शिवाय याबाबत विविध संशोधनपर उपक्रमांची माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या समस्या | Problems of farmers
राज्यात अनेक शेतकरी समस्यांचे दुखणे रडत शेती करत आहेत. त्यात तथ्य असलेतरी धोक्याच्या सर्व बाबी विचारात घेउनच व्यवसाय यशस्वी होत असतो, ही बाब मात्र सामान्य शेतकरी विसरतो. पाऊस अगदी वेळेवर सुरू होईल, तो ठराविक काळाने सतत पडत राहिल, उत्तम प्रकारचे बियाणे आणि रासायनिक खते वेळेवर मिळतील, पीकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही, कापणीच्या वेळी पाऊस अजिबात पडणार नाही आणि कापणी झाल्याबरोबर शेतमालाला उत्तम भाव मिळेल आणि असा शेतमाल निर्यात केल्यास त्या देशातील गुणवत्ता चाचणीही तो यशस्वीपणे पार पाडेल असे स्वप्न बघत शेतकरी शेती करतो. परंतु वरील बाबींपैकी एखादी बाब त्याच्या मनाप्रमाणे होते किंवा तीसुद्धा होत नाही.
पंरतु सर्वच शेतकरी हारणारे नसतात, काही लढवय्येही असतात. इतर लोक जेव्हा निसर्गाला नावे ठेवत शेती सोडून देतात, त्याही परिस्थितीत असे शेतकरी उत्तम प्रकारे शेती करून दाखवू शकतात. अशा शेतकर्यांची ओळख इतरांना व्हावी, त्यांच्या यशस्वी शेतीची उदाहरणे ऐकून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशानेच हा सत्कार कार्यक्रम आखण्यात आला होता. त्याला अपेक्षेपेक्षा उत्तम प्रतिसाद मिळाला.
शेतकरी केवळ शेतीवर मोठा होत नसतो, ज्या शेतकर्यांचे शेतीला पूरक जोडधंदे आहेत असेच शेतकरी मोठे होऊ शकतात. यासाठी शेतकर्यांनी शेतीबरोबर जोडधंद्यांनाही महत्त्व दिले पाहिजे. त्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मधमाशीपालन, वराह पालन, लार्व्ही पालन, अळिंबी पालन, ससे पालन, इमू पालन, बदक पालन, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, शेतमाल प्रक्रिया, रेशीम उत्पादन अशा अनेक व्यवसायांची मदत घेता येऊ शकते.
हा मुख्य संदेश सत्काराच्या वेळी निवड केलेल्या उद्यमशील शेतकर्यांनी सर्वांपुढे पोहचविला. केवळ उपदेशच नव्हे तर इतर शेतकर्यांपुढे आपल्या आजूबाजूला असलेल्या यशस्वी शेतकर्यांचे प्रत्यक्ष उदाहरणच या कार्यक्रमाद्वारे सादर करण्यात यावेळी शासनाला यश आले. या संदेशाने जागृत होऊन आता शेतकरी शेती यशस्वी करण्यासाठी शेतीस जोडधंद्याचा निश्चितपणे विचार करतील.
भारतीय शेतकऱ्यांच्या कौतुकाची गरज | Need for Indian farmers appreciation
देशाच्या अर्थव्यवस्थेत, अन्नसुरक्षा आणि एकूणच कल्याणात भारतीय शेतकऱ्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेऊन अनेक कारणांसाठी भारतीय शेतकऱ्यांचे कौतुक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय शेतकऱ्यांचे कौतुक करण्याचे महत्त्व खालील बाबींवरून स्पष्ट होते.
- शेतकऱ्यांमुळे अन्न सुरक्षा: भारतीय शेतकरी हा देशाच्या अन्नसुरक्षेचा कणा आहे. मोठ्या लोकसंख्येसाठी मुख्य आहार पिकविण्याचे महत्त्वाचे काम भारतीय शेजारी करतात.
- शेतीचे आर्थिक योगदान: भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. रोजगार, उत्पन्न आणि आर्थिक वाढ यामध्ये शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
- शेती ग्रामीण समाजाची जीवनरेखा: शेतकरी हे ग्रामीण समुदायांची जीवनरेखा आहेत, जिथे बहुतेकदा शेती हा प्राथमिक व्यवसाय असतो. शेतकर्यांचे कौतुक केल्याने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण कल्याणात योगदान दिल्यासारखेच आहे.
- कठोर परिश्रम आणि समर्पण: शेती हा श्रमिक आणि आव्हानात्मक व्यवसाय आहे. भारतीय शेतकर्यांची मेहनत आणि समर्पण ओळखणे, तसेच त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कामात अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांचे कौतुक आवश्यक आहे.
- नावीन्य आणि अनुकूलता: हवामानातील बदल, बाजारातील गतिशीलता किंवा तंत्रज्ञानातील प्रगती याला प्रतिसाद म्हणून शेतकरी अनेकदा नवनवीन शोध घेतात आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि जुळवून घेण्याच्या क्षमतेचे कौतुक केल्याने कृषी क्षेत्रात आणखी प्रगती होण्यास प्रेरणा मिळते.
- आव्हानांचा सामना करताना लवचिकता: भारतीय शेतकऱ्यांना वारंवार हवामानातील अनिश्चितता, कीटक आणि बाजारातील चढउतार यासारख्या आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यांची संकटांवर मात करण्याची क्षमता मान्य केल्याने शेतकरी समुदायाची ताकद अधोरेखित होते.
भारतीय शेतकऱ्यांचे कौतुक केल्याने शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येतील दरी कमी होण्यास मदत होते. शाश्वत आणि समृद्ध कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी, अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्रामीण आणि शहरी समुदायांमध्ये सुसंवादी संबंध निर्माण करण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांची प्रशंसा महत्त्वपूर्ण आहे.
- योगेश रमाकांत भोलाणे
---------------------------------
हे सुद्धा वाचा-
हे सुद्धा वाचा-