My son, who is a first-time learner, is very good at maths, as a math master, but seeing his disregard for his increased weight, does he miss his maths here? Such a question arises. But the bigger question is how to implement solutions to it.
अनिकेत,
अतिशय हुशार आणि स्मार्ट असा पहिलीत शिकणारा माझा मुलगा.
या वयातच त्याचे गणिताबाबतचे ज्ञान नेहमीच माझा अभिमानाचा विषय ठरला होता. त्याचे गणिताचे ज्ञान बघून त्याला अनेक जण मॅथमास्टर ( Math Master) या नावाने हाक मारतात. तो सुद्धा आनंदाने या नावाला प्रत्येकवेळी साद देतो. त्याच्या शाळेत तो एकमेव असा विद्यार्थी आहे की तो क्लास टिचरच्या मागे लागून गणिताच्या होमवर्कसाठी आग्रह करतो. त्याच्या शाळेत माझी ओळख माझ्या नावाने नसून मॅथमास्टरचे वडील अशीच आहे.
चला आता पुरे झाली, अनिकेतची स्तुती, मुळ मुद्याकडे वळू.
अशाच एका साधारण दिवशी मी अनिकेतला शाळेत पोहोचविण्यासाठी निघालो.
त्याच्या शाळेच्या गेट समोरील गर्दी पाहून मी मुख्य रस्त्यावरच गाडी बाजूला केली आणि त्याला म्हटले,
‘‘ अनिकेत, येथेच उतर. येथून पायीच जा.’’
तो नाराजीनेच उतरला आणि म्हणाला,
‘‘पप्पा येथून माझी शाळा फार तर फार ७४ मीटर अंतरावर आहे, इतक्या दूर मला उतरवून गाडीचे असे किती पेट्रोल वाचणार आहे. ’’
त्याच्या प्रश्नाने मी पण नाराज झालो, पण संताप बाजूला ठेवून अतिशय शांत स्वरात मी त्याला म्हणालो,
‘‘बाळ अनिकेत आता तू ४२ चा झाला, आता थोडे तरी पायी चालत जा!’’
‘‘पप्पा काहीपण , ४२ वर्षाचे तुम्ही झाले, मी तर अजून फक्त सात वर्षाचाच आहे. तुमचे गणित चुकले वाटत, बरोब्बर की नाही?’’ असे म्हणत अनिकेत शाळेकडे निघाला.
..
..
..
..
..
..
खरच माझे गणित चुकले का? का मला अनिकेतला वेगळा इशारा द्यायचा आहे?
हा इशारा तुम्ही तरी ओळखला का?
खरे तर मला अनिकेतच्या वजनाबाबत म्हणायचे होते. गाडीपासूनचे शाळेच्या गेटपर्यंतच्या अंतराचा त्याने योग्य अंदाज केला, असे किती पेट्रोल वाचेल हा टोला सुद्धा त्याचा येथे योग्य बसला. मात्र माझा इशारा तो समजू शकला नाही. हा इशारा त्याने समजून घ्यायला हवा होता. म्हणजेच मॅथमास्टरला पुस्तकातील गणित पटकन समजते मात्र त्याच्या वजनाचे गणित त्याला उमजत नाही.
पहिलीत असतांनाच त्याचे वजन ४२ किलो भरते. त्याच्या वर्गात सर्वात जास्त त्याचेच वजन आहे, असे मात्र नाही. त्याच्यापेक्षा जास्त वजन असलेले आणखी काही मुले त्या वर्गात आहेत.
असे का?
जसे की मैदानी खेळांना, व्यायाम आणि योगा यांना दररोज पुरेसा वेळ द्यावा, फास्ट फूड आणि जंक फूड यांचे नियंत्रित सेवन करणे असे अनेक उपाय आहेत.
मात्र हेे उपाय कसे अमलात आणावेत, हा प्रश्न पडतो.
बरे, अधिक वजनाबाबत स्पष्ट सांगितले तर,
म्हणजेच, ही मुले स्मार्ट असली तरी भावनात्मक दृष्ट्या मजबूत असतातच असे नाही. त्यामुळे त्यांच्या अधिक वजनाच्या समस्येवरील उपाय स्पष्ट आणि ठोस स्वरूपात कसे अमलात आणावेत, हा प्रश्न पडतो.
तुम्हालाही असे प्रश्न नक्की पडत असतील, नाही का?

व्यायामाचा अभाव, मैदानी खेळांचा अभाव,सद्याची चुकीची खाद्य पद्धती अशी अनेक कारणे यामागे आहेत. कारणे माहीत आहेत, उपायसुद्धा माहीत आहेत.
जसे की मैदानी खेळांना, व्यायाम आणि योगा यांना दररोज पुरेसा वेळ द्यावा, फास्ट फूड आणि जंक फूड यांचे नियंत्रित सेवन करणे असे अनेक उपाय आहेत.
मात्र हेे उपाय कसे अमलात आणावेत, हा प्रश्न पडतो.
बरे, अधिक वजनाबाबत स्पष्ट सांगितले तर,
मी उद्यापासून जेवणच बंद करतो,
मी एक वेळ जेवणारच नाही,
मी शाळेत डबाच नेणार नाही,
जेवण कमी तर अभ्यासही कमी करेल,
५० हजार पावले चालावी लागली तरी चालेल, मी शाळेत पायीच जाईल ’
अशा स्वरूपातील प्रतिक्रिया या मुलांकडून ऐकायला मिळतात.
म्हणजेच, ही मुले स्मार्ट असली तरी भावनात्मक दृष्ट्या मजबूत असतातच असे नाही. त्यामुळे त्यांच्या अधिक वजनाच्या समस्येवरील उपाय स्पष्ट आणि ठोस स्वरूपात कसे अमलात आणावेत, हा प्रश्न पडतो.
तुम्हालाही असे प्रश्न नक्की पडत असतील, नाही का?
मग हा लेख वाचून थांबू नका, लिहिते व्हा.
या लेखाबाबत आपले विचार, आपले मनोगत आणि वर उल्लेख केलेल्या समस्यचे उपाय आणि ते कसे अमलात आणावेत याबाबत आपले मत खालील कमेंट मध्ये लिहा.
वाट पहातोय.
(कथा-काल्पनिक, पात्र-काल्पनिक, समस्या-सर्वांची)
कमी वयातच लठ्ठपणामागील कारणे
लहान मुलांचा लठ्ठपणा हे भारतातील वाढती चिंतेची बाब आहे आणि या समस्येला कारणीभूत अनेक कारणे आहेत. येथे काही प्रमुख घटक आहेत:
- 1. अयोग्य आहार: प्रक्रिया केलेले, उच्च-कॅलरी आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ, साखरयुक्त पेये आणि फास्ट फूडचा वाढीव वापर.
- 2. शारीरिक हालचालींचा अभाव: बैठी जीवनशैली, मैदानी खेळ कमी करणे आणि वाढलेली स्क्रीन वेळ (टीव्ही, मोबाईल इ.).
- 3. सामाजिक-आर्थिक घटक: समृद्धी आणि शहरीकरणामुळे अस्वास्थ्यकर अन्नपदार्थांचा भोजनात समावेश आणि शारीरिक हालचाली कमी होतात.
- 4. अनुवांशिक पूर्वस्थिती: लठ्ठपणा आणि अनुवांशिक घटकांचा कौटुंबिक इतिहास.
- 5. सांस्कृतिक घटक: पारंपारिक भारतीय आहारांमध्ये अनेकदा साखर, मीठ आणि अस्वास्थ्यकर चरबी जास्त असतात.
- 6. जागरूकतेचा अभाव: पालकांमध्ये मध्ये निरोगी खाण्याच्या आणि व्यायामाच्या सवयींबद्दल मर्यादित ज्ञान.
- 7. शहरीकरण आणि स्थलांतर: ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जाण्यामुळे जीवनशैली आणि आहारातील बदल.
- 8. वाढलेला स्क्रीन वेळ: जास्त टीव्ही पाहणे, व्हिडिओ गेम खेळणे किंवा डिजिटल उपकरणे वापरणे.
- 9. खराब अन्न निवडी: रस्त्यावरील खाद्यपदार्थ, बेकरी आणि अस्वास्थ्यकर अन्न देणाऱ्या रेस्टॉरंटचे वारंवार सेवन.
- 10. शारीरिक शिक्षणाचा अभाव: शाळा आणि समुदायांमध्ये शारीरिक हालचालींवर अपुरा भर.
- 11. सामाजिक-सांस्कृतिक दबाव: बक्षीस किंवा सांत्वन म्हणून अन्न वापरणे, ज्यामुळे अति खाणे.
- 12. आरोग्यदायी पर्यायांपर्यंत मर्यादित प्रवेश: शाळा, समुदाय किंवा ग्रामीण भागात निरोगी अन्न निवडीची अनुपलब्धता.
बालपणातील लठ्ठपणा म्हणजेच लहान वयातील लठ्ठपणा ही भारतातील एक गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या मुलांचे आरोग्य, आरोग्य आणि भवितव्य धोक्यात आले आहे. लठ्ठपणाच्या दरात झालेल्या चिंताजनक वाढीकडे त्वरित लक्ष देण्याची आणि सामूहिक कारवाईची गरज आहे. या समस्येला कारणीभूत असलेल्या घटकांचा गुंतागुंतीचा परस्परसंवाद समजून घेऊन, पालक, धोरणकर्ते, शाळा आणि समुदायांनी असे आपण आपल्या मुलांसाठी आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने काम करू शकतो आणि त्यांच्यासाठी निरोगी सवयी, संतुलित आहार आणि नियमित शारीरिक क्रियाकलापांना प्रोत्साहन देण्यात हातभार लावू शकतो.
- योगेश रमाकांत भोलाणे
Mob- 9881307618bholaneyogesh18@gmail.com
( Writer, Video Editor, blogger, Youtuber)