Raw ginger and exercise pains |
व्यायामाच्या वेदनांवर कच्चे आले
- रोग प्रतिकारक शक्तीचे महत्त्व
- कच्च्या आल्याचे उपयोग
- व्यायामाच्या वेदनांवर आले
- व्यायाम-संबंधित वेदनांसाठी आले समाविष्ट करण्याचे मार्ग
- कच्च्या आल्याचे प्रमाण
- भारतात अद्रक चे वेगवेगळी नावे
- निष्कर्ष
रोग प्रतिकारक शक्तीचे महत्त्व | Importance of immunity
त्या व्हायरसमुळे निर्माण झालेली अनपेक्षित स्थिती आणि त्यानंतरचे lockdown तर आता सर्वश्रूत आहे. हात धुणे, हायजिन व्यवस्थापन करणे त्या सोबत रोग प्रतिकारक शक्ती - Immunity वाढविणे या बाबींना आता फार महत्त्व प्राप्त झाले आहे. काढा हे आता डॉक्टरांचे औषध राहिलेले नसून प्रत्येक घरात त्या व्हायरसच्या भितीने काढा घेतला जात आहे. या काढ्यात सर्वात महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे आले.
स्वयंपाकघरात आल्याचा वापर दररोज केला जातो. अनेक भाज्यांमध्ये आले (Zingiber officinale) वापरले जातो. चहामध्ये आले वापरणे आता तर नित्याचेच झाले आहे. सहसा करून आपण आले प्रक्रिया करूनच वापरतो, म्हणजे थेट आले तोंडात टाकून खात नाही. भाजी मध्ये आणि चहामध्ये आले टाकले तर त्यावर आपोआप प्रक्रिया होत असते. पण कच्या आल्याचे उपयोग तुम्हाला माहीत आहे का? प्रक्रिया केलेल्या आल्याप्रमाणे कच्चे आलेही आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असते. ते कसे?
कच्च्या आल्याचे उपयोग- Use of raw ginger
ताजे आले, कोरडे आले पावडर, आलेमधील ओलिओरेसिन घटक आणि आल्याचे तेल अन्न प्रक्रियेत वापरले जाते. तसेच जिंजर ब्रेड, मिठाई, करी पावडर, टेबल सॉस, लोणचे आणि विशिष्ट कॉर्डियल, आले कॉकटेल, कार्बोनेट ड्रिंक्स, मद्य इत्यादी अन्न पदार्थांमध्ये आले वापरले जाते.अदरकचे सविस्तर उपयोग खालील प्रमाणे -
- पोटाच्या तक्रारी- कच्या आल्याच्या सेवनामुळे मळमळ ( Nausea ) आणि पोटाच्या तक्रारीवर ( Stomach complaints ) आराम मिळतो.
- पाचक- आयुर्वेदिक औषधांमध्ये पाचक औषधे, सारक औषधे, खोकल्यावरील आणि वातावरील औषधे ( Digestive drugs, essential drugs, cough and flatulence drugs ) तयार करण्यासाठी आले वापरतात. आले भूकवर्धक आणि पित्तनाशक ( Appetizers and cholagogue ) असते. कच्चे आले जठराग्नी प्रदीप्त करणे, रूची वाढविणे, जीभ स्वच्छ (Moblising of the stomach, increase appetite, clean the tongue ) करण्यासाठी उपयुक्त असते.
- फ्लेवरिंग एजंट: कच्चे आले पदार्थांना तिखट, मसालेदार आणि किंचित गोड चव देते. विविध पाककृतींमध्ये हा एक सामान्य घटक आहे.
- ताजे लोणचे: कच्च्या आल्याचे तुकडे अनेकदा लोणचे बनवण्यासाठी वापरले जातात, ते तुकडे एक विशिष्ट चव आणि पोत प्रदान करतात.
- आले चहा: ताज्या आल्याचा वापर चहा तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो, अद्रक चहा हे एक लोकप्रिय पेय म्हुणू प्रसिद्ध आहे. हे त्याच्या संभाव्य आरोग्य फायद्यांसाठी जसे की पचनास मदत करणे आणि मळमळपासून आराम देणे यासाठी वापरले जाते.
- सॉस: किसलेले कच्चे आले बहुतेकदा सॉस तयार करण्यासाठी वापरले जाते, ज्यामुळे विविध पदार्थांची चव वाढते.
- मिष्टान्न: केक, पुडिंग्स आणि आइस्क्रीम यांसारख्या डेझर्ट तयार करण्यासाठी ताजे आले वापरता येते.
- पाचक सहाय्य: आले त्याच्या संभाव्य पाचन फायद्यांसाठी ओळखले जाते. अपचन, सूज येणे आणि मळमळ कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
- सर्दी आणि फ्लू उपाय: आले सामान्यतः सर्दी आणि फ्लू साठी घरगुती उपचारात वापरले जाते. मध आणि लिंबूसह आले चहा हा घसा खवखवणे आणि रक्तसंचय दूर करण्यासाठी एक लोकप्रिय उपाय आहे.
- मोशन सिकनेस आणि मळमळ: कच्च्या आल्याचा छोटा तुकडा चघळणे किंवा आल्याचा चहा प्यायल्याने मोशन सिकनेस आणि मळमळ होण्याची लक्षणे कमी होण्यास मदत होऊ शकते.
असे आल्याचे उपयोग भरपूर आहेत. हे तर आपल्याला चांगले माहीत असतीच. आता तर अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी आल्याचे आणखी काही नवीन उपायेग सिद्ध केले आहेत.
व्यायामाच्या वेदनांवर आले- Ginger on the pains of exercise
अचानक व्यायाम सुरू केला आणि त्यांनंतर खूप व्यायाम केलातर स्नायुंमध्ये विशिष्ट प्रकारच्या वेदना हमखास होतात. या वेदना निश्चित अशा संज्ञेमध्ये बांधता येत नाही आणि सांगता येत नाही. मुकामार लागला तर शरीरात आत वेदना होतात, तशाच व्यायम केल्यावर होणार्या वेदना शरीराच्या आत मध्ये होतात. पण त्यांचे दुखणे वेगळ्या प्रकारचे असते. त्यावर अलिकडे अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की भरपूर व्यायाम केल्यामुळे स्नायुंमध्ये ज्या वेदना होतात त्या कच्च्या आल्याच्या सेवनामुळे कमी होतात. अशा कच्च्या आल्याचे सेवन त्याचा रस काढून किंवा अन्नपदार्थांमध्ये मिसळून करता येते.- स्नायू दुखणे कमी - काही वैज्ञानिकांनी व्यायामानंतर स्नायू दुखणे आणि वेदना कमी करण्यासाठी आल्याची क्षमता शोधून काढली आहे. आल्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे हे शक्य होते.
- दाहक-विरोधी प्रभाव: आल्यामध्ये दाहक-विरोधी प्रभावांसह जिंजरॉल ही जैव सक्रिय संयुगे असतात. व्यायामानंतर आलेल्या सुजेवर ही सयुंगे उपयुक्त असतात.
- सांधेदुखीपासून आराम: व्यायाम किंवा ऑस्टियोआर्थरायटिस सारख्या परिस्थितीशी संबंधित सांधेदुखीचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तींना आले फायदेशीर ठरू शकते. आल्याचे दाहक-विरोधी गुणधर्म सांधेदुखी कमी करण्यास आणि गतिशीलता सुधारण्यास मदत करतात.
व्यायाम-संबंधित वेदनांसाठी आले समाविष्ट करण्याचे मार्ग:
- आले चहा: गरम पाण्यात ताज्या आल्याचे तुकडे टाकून आल्याचा चहा तयार करा. अदरक चहाचे नियमित सेवन केल्यास दाहक-विरोधी फायदे मिळू शकतात.
- स्मूदीज आणि ज्यूस: स्मूदीज किंवा ज्यूसमध्ये ताजे आले घालावे जेणेकरुन चवदार आणि संभाव्य वेदना कमी होण्यास मदत होईल.
- जेवणात समाविष्ट करा: ताजे किंवा ग्राउंड आल्याचा वापर स्वयंपाक करताना डिशमध्ये चव वाढवण्यासाठी करता येतो. अदरक विविध पाककृतींमध्ये समाविष्ट केले जाते.
हात पाय दुखल्यांमुळे आपला व्यायामाचा हा संकल्प बंद झाला असेल तर आल्याचे सेवन वाढवा, त्यामुळे आपल्या वेदना निश्चित कमी होतील आणि संकल्प कायम स्वरूपी बंद न होता रोजच व्यायाम सुरू राहिल.
कच्च्या आल्याचे प्रमाण- Amount of raw ginger
कच्च्या आल्याच्या रसाचे अतिरिक्त सेवन अपेक्षित परिणाम दाखवत नाही आणि त्यामुळे वेगळ्या समस्या निर्माण होतात. हे टाळण्यासाठी सुरूवातीला फक्त दिवसातून एकदा १० मिली रस घ्यावा आणि नंतर दर दिवशी त्याचे प्रमाण वाढवावे. एका दिवसात ५० ते ६०मिलीच्या वर रस घेऊ नये. ज्यांनी यापूर्वी कधीही आल्याचा आहारात उपयोग केलेला नसेल त्यांनी तर आल्याचा रस घेण्यापूर्वी विशेष खबरदारी बाळगावी. आल्याचा रस सूरूवातीला फक्त ५ मिली घ्यावा आणि नंतर हळुहळु त्याचे प्रमाण वाढवावे.भारतात अद्रक चे वेगवेगळी नावे | Different names of ginger in India
ढगाळ आणि पावसाळी वातावरणात घसा खराब झाल्यावर आल्याचा चहा करण्यासाठी , भाजीला विशिष्ट चव देण्यासाठी, इतर वनस्पतींच्या रसामध्ये पोष्टीकता आणि स्वाद वाढविण्यासाठी आणि आरोग्याच्या इतर तक्रारींवर आल्याची आठवण येते. वरील लेख वाचल्यावर आता आपणास व्यायामाच्या वेदनांवरही आल्याची आठवण होणार आहे. थोडक्यात काय की आल्याचा रस प्या आणि व्यायाम थांबवू नका.
माहिती संकलन-- योगेश रमाकांत भोलाणे
Read more about author
Read more about author
हे सुद्धा वाचा-