परदेशी भाजीपाला | Exotic Vegetables

Exotic Vegetables
Exotic Vegetables

बाजारपेठेत ज्या शेतमालाला मागणी असते, तो शेतमाल शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसतो आणि शेतकरी जे पिकवितो, तो माल मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत आल्यामुळे त्या शेतमालाला दर कमी मिळतो. बऱ्याच वेळा इतका कमी दर मिळतो की शेतकरी तो माल बाजारात विकायला आणत सुद्धा नाहीत, शेतातच तो वाया जातो. हे टाळण्यासाठी बाजारपेठेचा अंदाज घेऊनच शेती पिकविली पाहिजे. परदेशी भाज्या, जसे की ब्रोकोली, झुचीनी आणि भोपळी मिरची, आहारातील विविधता वाढवतात आणि संतुलित पोषण वाढवतात. ते पचन सुधारू शकतात, प्रतिकारशक्ती वाढवू शकतात आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास समर्थन देऊ शकतात. विदेशी भाज्यांचा समावेश केल्याने शाश्वत शेती पद्धती आणि कृषी बाजारपेठांमध्ये वैविध्य आणून आर्थिक वाढीस प्रोत्साहन मिळते. त्यांचे अनोखे फ्लेवर्स आणि पोत स्वयंपाकासंबंधी अनुभव वाढवतात. 

परदेशी भाजीपाला पिकांचा विचार कधी?

मोठ्या शहरात आता परदेशी भाज्यांची - Pardeshi Bhajipala मागणी वाढत आहे आणि पुरवठा मात्र त्यामानाने कमी आहे. म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या भाज्यांच्या लागवडीस वळण्यासाठी वाव निर्माण झाला आहे.

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे
  • परदेशी भाज्या कोणत्या?
  • परदेशी भाज्यांची उपयुक्तता
  • ब्रोकोली-पोषणमुल्यांचा मुकुटमणी
  • सेज-सुगंधी द्रव्य वनस्पती
  • झुकिनी - कमी फॅट्स
  • चायनीज कॅबेज
  • शलगम (टर्निप)
  • निष्कर्ष

अवेळी येणारा पाऊस, त्यामुळे निर्माण होणारा ओला किंवा कोरडा दुष्काळ, गारठणारी थंडी, वादळ-वारे, चक्रीवादळ, बाजारपेठेतील ऐनवेळी कोसळणारे दर, शेतमालाचा भाव ठरविणारी अयोग्य पद्धत, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात होणारी दिरंगाई, बोगस बियाणे आणि आता अलिकडेच सुरू झालेले ग्लोबल वार्मींग - Global warming अशा अनेक समस्या शेतकर्‍याच्या विकासातील प्रमुख अडथळे समजल्या जातात. याच समस्यांवर प्रत्येकवेळी मंथन केले जाते. याव्यतिरिक्त जरी अनेक समस्या असल्यातरी त्या स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या असतात. पण एक समस्या मात्र संपूर्ण भारतात आढळते, विशेष म्हणजे या समस्येवर अजुनही हवे तसे चिंतन केले जात नाही. शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा विचार न करता शेती करणे, या समस्येला शेतकऱ्यांनी अजुनही गंभीरपणे घेतलेले दिसत नाही. थोडक्यात म्हणजे बाजारपेठेत ज्या शेतमालाला- Shetmal मागणी असते, तो शेतमाल शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसतो आणि शेतकरी जे पिकवितोतो माल मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत आल्यामुळे त्या शेतमालाला दर कमी मिळतो. ऱ्याच वेळा इतका कमी दर मिळतो की शेतकरी तो माल बाजारात विकायला आणत सुद्धा नाहीत, शेतातच तो वाया जातो. हे टाळण्यासाठी बाजारपेठेचा अंदाज घेऊनच शेती पिकविली पाहिजे

"जे आपण पिकवितो ते विकण्यासाठी धडपड केल्या पेक्षा जे विकल्या जाते, तेच पिकविल्यास शेतमाल सहज विकला जातो आणि भाव सुद्धा चांगला मिळतो.

परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांनी निरनिराळ्या हंगामात जवळजवळ सर्व प्रकारची पिके घेतली आहेत, म्हणून नेमके पिकवायचे काय? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण होतो. यासाठी उत्तर म्हणून परदेशी भाजीपाल्यांचा एक चागंला पर्याय समोर येत आहे. मोठ्या शहरात आता परदेशी भाज्यांची मागणी वाढत आहे आणि पुरवठा मात्र त्यामानाने कमी आहे. म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या भाज्यांच्या लागवडीस वळण्यासाठी वाव निर्माण झाला आहे

                भाजीपाला उत्पादनात जगात चीनचा प्रथम क्रमांक लागतो आणि त्याखालोखाल भारताचा दुसरा क्रमांक लागतो. प्रति हेक्टरी भाजीपाला उत्पादनात स्पेन प्रथम स्थानावर आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 49 लाख मे.टन निरनिराळ्या भाज्यांचे उत्पादन होत आहे. परंतु अजूनही महाराष्ट्रात पारंपारिक भाज्यांचीच शेती केली जाते. इतर भाज्यांकडे शेतकरी वळलेला नाही. काही उत्कृष्ट आणि शरीरास आवश्यक असलेले चांगली पोषक द्रव्ये पुरविणाऱ्या भाजीपाल्यांची ओळख उत्पादकांना आणि गिऱ्हाईकांना अजूनही झालेली नाही. या भाज्या म्हणजे परदेशी भाज्या Pardeshi Bhajya  होय, इंग्रजीत त्यांना एक्झॉटिक व्हेजीटेबल  Exotic Vegetables असे म्हणतात.

परदेशी भाज्या कोणत्या? What are exotic vegetables?

परदेशी भाज्यांमध्ये लेट्यूस Lettuce, झुकिनी zucchini , ब्रोकोली Broccoli, चायनीज कॅबेज Chinsese Cabbage, ऍस्परागस Asparagus , सेज Sage , सबर्ब, आर्टिचोक, टर्निप Turnip , स्वीट कॉर्न- Sweet Corn,  लिक, पास्ली इत्यादी येतात. या भाजीपाल्यांची ओळख फक्त काही मोठ्या शहरांमध्ये असल्याने त्या शहरांच्या आजूबाजूच्या परिसरातच अतिशय थोड्या प्रमाणात या परदेशी भाज्या घेतल्या जातात. त्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना या भाज्यांची ओळख होणे फार गरजेचे आहे. 

परदेशी भाज्यांची उपयुक्तता- Usefulness of foreign vegetables-

खरेतर या परदेशी भाज्या बहुतेक करून कच्च्या स्वरूपातच म्हणजे सॅलॅड - Salad म्हणूनच खाण्यासाठी वापल्या जातात. या भाज्या शिजवून खाण्याची पद्धत नाही. सध्या मोठ्या शहरातील मोठ्या हॉटेल्स, रिसोर्ट - Resort मध्ये या परदेशी भाज्यांचा उपयोग होतो. त्यामुळे तेथे या भाज्यांची वर्षभर मागणी असते. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात या परदेशी प्रकारच्या भाज्या उपलब्ध झाल्यास, लोकांमध्ये या भाज्यांची चव निर्माण झाल्यास आणि या परदेशी भाज्या लोकांच्या पसंतीस उतरल्यास या भाज्यांची मागणी निश्‍चित वाढू शकते. 

ब्रोकोली-पोषणमुल्यांचा मुकुटमणी । Broccoli- The crown jewel of nutrition

ब्रोकोली (Brassica oleracea var. italica) ही एक पौष्टिक आणि बहुमुखी भाजी आहे जी ब्रासिकासी कुटुंबातील आहे, ज्यामध्ये कोबी, फुलकोबी यांचाही समावेश आहे. ब्रोकोली व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, फोलेट, फायबर आणि विविध अँटिऑक्सिडंट्ससह आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. हे पोटॅशियम आणि मॅंगनीज सारख्या खनिजांचा देखील चांगला स्रोत आहे. ब्रोकोली मध्ये अँटिऑक्सिडंट आणि विरोधी दाहक गुणधर्मांचा समावेश आहे. हे हृदयाच्या आरोग्यास समर्थन देण्याशी आणि कर्करोगाशी लढणारी संयुगे प्रदान करण्याशी देखील संबंधित आहे.

    ब्रोकोली हे कोबीवर्गीय पीक असून त्यामध्ये उच्च तंतुमय पदार्थ, पुरेशी जीवनसत्वे आणि उष्मांक कमी असल्यामुळे ब्रोकोलीला पोषणमुल्यांचा मुकुटमणी असे म्हटले जाते. ब्रोकोली उच्च रक्तदाब High B.P. , मधुमेह Diabetes , ह्दयरोग ( हार्ट अटॅक ), कर्करोग - Cancer  यासारख्या रोगांवर गुणकारी अशी औषधी वनस्पती आहे. म्हणूनच उत्तम आरोग्यासाठी एक स्वादिष्ट भाजी असे बिरूद लावून ब्रोकोली प्रसिद्ध आहे. तसेच ब्रोकोलीचे बर्गर, पॅटीस, सॅलॅड, सूप इत्यादी पदार्थ लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे येथून ब्रोकोलीचे अधिक उत्पादन देणारी गणेश ब्रोकोली ही नवीन जात विकसित केली आहे. 

सेज-सुगंधी द्रव्य वनस्पती । Sage -Aromatic plants

सेज (Salvia officinalis) खरेतर ही केवळ भाजी नसून एक बारमाही औषधी वनस्पती आहे. हे पुदीना कुटुंबातील आहे (लॅमियासी) भाजी नसली तरी, सेज  बहुतेक वेळा विविध भाज्यांच्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरली जाते. सेजचा वापर त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी केला जातो. असे मानले जाते की यात दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडेंट प्रभाव आहे. सेज चहा  घसा खवखवणे आणि पाचन समस्या या विकारांवर उपयुक्त आहे. सेजची पाने हवेत वाळविले जाऊ शकतात किंवा डिहायड्रेटरमध्ये वाळवल्या जाऊ शकतात. वाळलेल्या सेजचा बराचसा स्वाद टिकून राहतो. 

    सेज ही झुडूपासारखी दिसणारी, बहुवर्षायु, बगीच्यांमध्ये आढळणारी सुगंधी द्रव्य वनस्पती आहे. विविध रंगी , बागेची शोभा वाढविण्यासाठी ही वनस्पती अनेक ठिकाणी वापरली जाते. या वनस्पतीच्या फुलात, पानात एक सुंगधी तेल असते, त्याचा उपयोग औषधे, किटकनाशके आणि डिओडोरंट - deodorant यामध्ये केला जातो. सेजच्या सुकविलेल्या पानांचा चुरा विविध भाज्या, चिज, फिश, मटण यामध्ये लज्जत वाढविण्यासाठी वापरतात. 

झुकिनी - कमी फॅट्स । zucchini- low in Fats 

ही उन्हाळी भोपळा वर्गीय परदेशी फळ भाजी आहे. झुकीनी (कुकुर्बिटा पेपो) ही एक लोकप्रिय उन्हाळी भाजी लौकी कुटुंबातील आहे. झुकीनी सामान्यतः विविध पाककृतींमध्ये वापरली जाते आणि ती पौष्टिक आणि कमी-कॅलरी भाजी म्हणून ओळखली जाते. झुकीनी ब्लॉसम म्हणून ओळखल्या जाणार्‍या झुचिनी वनस्पतीची फुले देखील खाण्यायोग्य आहेत. ते  स्वयंपाकासाठी वापरले जातात जसे की भरणे, तळणे किंवा सॅलडमध्ये जोडणे. झुचीनी ही एक पौष्टिक-दाट भाजी आहे जी आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स प्रदान करते. यामध्ये कॅलरी कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त आहे.

    झुकिनीचा शिजवून त्याचा खाण्यात, भाजी, जॅम किंवा फळावरील साल काढून त्यापासून भाजी अशाप्रकारे उपयोग होतो. चायनिज डिशमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये झुकिनीचा उपयोग केला जातो. या फळभाजीपासून फार कमी फॅट्स शरीरास मिळतात. म्हणून फॅट डाईट बाबत काळजी घेणारे लोक ही भाजी आवडीने खातात. 

चायनीज कॅबेज - Chinese Cabbage 

चिनी कोबीचे दोन सुप्रसिद्ध प्रकार म्हणजे नापा कोबी (ब्रासिका रापा सबस्पी. पेकिनेन्सिस) आणि बोक चोय (ब्रासिका रापा सबस्प. चिनेन्सिस). दोन्ही जाती Brassicaceae कुटुंबातील आहेत. नापा कोबी आणि बोक चोय या दोन्ही पौष्टिक-दाट भाज्या आहेत ज्यात कॅलरी कमी आहेत आणि जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर आहेत. चायनीज कोबीचे गड्डे लंबगोल अकाराचे, मध्यम, घट्ट असतात. नावच चायनीज असल्यामुळे याच्या बहुतेक जाती चीनमध्येच तयार झाल्या आहेत. या कोबीचा प्रामुख्याने वापर सलाडसाठी होतो. सलाड म्हणून ही भाजी मोठ्या हॉटेलमध्ये दिली जाते. 

या दोन मुख्य प्रकारांची वैशिष्ट्ये येथे आहेत:

  • नापा कोबी: या कोबीला चायनीज कोबी किंवा सेलेरी कोबी म्हणूनही ओळखले जाते.बोक चोयच्या तुलनेत यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे.
  • बोक चोय: या कोबीला पाक चोई किंवा चायनीज व्हाईट कोबी म्हणूनही ओळखले जाते.

 ते स्वयंपाकघरात अष्टपैलू आहेत आणि विविध प्रकारे तयार केले जाऊ शकतात, ज्यामध्ये तळणे, वाफवणे, उकळणे किंवा सॅलडमध्ये कच्चे खाणे समाविष्ट आहे.

चायनीज कोबीच्या जाती व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट आणि फायबरचा चांगला स्रोत असलेल्या त्यांच्या आरोग्य फायद्यांसाठी ओळखल्या जातात. याव्यतिरिक्त, त्यात संभाव्य अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांसह फायटोन्यूट्रिएंट्स असतात. आपल्या आहारात चायनीज कोबीचा समावेश केल्याने आपल्या जेवणात एक स्वादिष्ट आणि पौष्टिक घटक समाविष्ट होऊ शकतो.

शलगम (टर्निप) । Shalgam ( Turnip )

शलगम (टर्निप) हे थंड हवामानात वाढणारे भाजीपाला पीक आहे. शलजम (Brassica rapa subsp. rapa) ही खाण्यायोग्य पाने आणि मुळे असलेली भाजी आहे. हे ब्रासिकासी कुटुंबातील आहे, ज्यामध्ये ब्रोकोली, कोबी आणि मुळा सारख्या इतर क्रूसीफेरस भाज्यांचा समावेश होतो.  सलगमची लागवड त्यांच्या मुळांसाठी केली जाते. हे जमिनीत वाढणारे रूपांतरित मूळ आहे. या मुळाचा आणि पानांचा भाजीसाठी उपयोग होतो. शलगमच्या मुळाचा उपयोग खासकरून लोणच्यासाठी होतो. शलगममध्ये पोषकद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. विशेष म्हणजे कंदमुळापेक्षा शलगमच्या पानात मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे, क्षार आणि इतर घटक असतात. शलजममध्ये ग्लुकोसिनोलेट्ससह अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे संभाव्य आरोग्य फायद्यांशी संबंधित आहेत, जसे की दाहक-विरोधी आणि कर्करोगविरोधी गुणधर्म.

काही शेतकरी परदेशी भाजीपाला लागवडीबाबत जागृत झाले आहेत. अशा शेतकऱ्यांनी पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद,सातारा, सांगली, जालना, बुलढाणा येथे लहान क्षेत्रावर परदेशी भाज्यांची लागवड सुरू केलेली आहे. पाहिजे तसे मोठे क्षेत्र परदेशी भाज्यांखाली अजूनही उपलब्ध झालेले नाही.

निष्कर्ष ( Conclusion)-

बहुंतांश परदेशी भाज्यांचे उत्पादन थंड हवामानातच चांगल्या प्रकारे घेता येते. काही परकिय भाज्यांची लागवड खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिनही हंगामात म्हणजेच वर्षभर पॉलिहाऊसमध्ये उत्तम प्रकारे करता येते. सध्या काही बियाणे कंपन्यांनी परदेशी भाजीपाला पिकांचे बियाणे आपल्या भागातील हवामान लक्षात घेऊन उपलब्ध करून दिले आहे. आता महाराष्ट्रात हे बियाणे सहज उपलब्ध होत आहे. शेतकऱ्यांनी येथे एक महत्वाचा मुद्दा विचार करण्यासारखा आहे तो म्हणजे थेट सर्वच शेतावर परदेशी भाजीपाल्याची शेती करू नये. प्रथम पारंपारिक भाजीपाला लागवडीसोबत प्रायोगिक स्वरूपात काही क्षेत्रावर परदेशी भाज्यांची लागवड सुरू करावी. म्हणजेच संपूर्ण क्षेत्र परदेशी भाजीपाल्याखाली न आणता शेतीच्या काही भागावर सुरूवात करून, त्याचे उत्पादन आणि उत्पन्नाचा अभ्यास करून परदेशी भाजीपाला शेती सुरू करण्यास शेतकऱ्यांनी आता आणखी उशीर करू नये.

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने

इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या