ऑनलाईन परीक्षा आज न् उद्या सर्वांना | Online exam today and tomorrow for everyone

Online exam today and tomorrow for everyone
Online-Exam

ऑनलाईन परीक्षा आज न् उद्या सर्वांना

त्या व्हायरसची भीती आणि लॉकडाऊन यामुळे ऑनलाईन परीक्षांचे महत्त्व वाढले आहे. जास्तीत जास्त परीक्षा ऑनलाईनच घेण्याच्या दृष्टीने सरकार आता नियोजन करीत आहे. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन परीक्षा ही इंटरनेटद्वारे आयोजित डिजिटल परीक्षा आहे. ऑनलाइन परीक्षा वेळापत्रक आणि स्थानामध्ये लवचिकता देतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना घरातून किंवा इतर दुर्गम स्थानांवरून चाचण्या घेता येतात. ते तत्काळ फीडबॅक आणि सुव्यवस्थित ग्रेडिंग प्रदान करतात. आधुनिक शिक्षणातील सोयी आणि कार्यक्षमतेमुळे ही पद्धत अधिक लोकप्रिय होत आहे.ऑनलाईन परीक्षा कशी द्यायची? तयारी कशी करायची? या परीक्षेचे फायदे आणि मर्यादा कोणत्या?

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे

  • ऑनलाईन परीक्षेचे फायदे
  • ऑनलाईन परीक्षा पद्धतीच्या मर्यादा
  • ऑनलाईन परीक्षा कशी द्यावी?
  • ऑनलाईन परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन
  • डेमो परीक्षा / सराव परीक्षा
  • ऑनलाईन परीक्षा समस्या आणि समाधान

राज्यातील विविध विद्यापीठ आणि संस्थांमधील पेेपर फूट प्रकरण आणि परीक्षेतील गैरप्रकाराला ( Exam malpractice ) आळा घालण्याच्यादृष्टीने काही वर्षांपूर्वी शासनाने उच्च स्तरीय समिती नेमून अहवाल मागविले होते. या समितीने अनेक उपायांसोबत परीक्षा ऑनलाईनपद्धतीने (online exams) घेण्याच्या उपायांवर अधिक भर दिला. परंतु ऑनलाईन परीक्षा सरसकट एकदम सर्वांना लागू करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने अशी पद्धत लागू करावी आणि सुरूवातीला खास करून अभियांत्रिकी ( engineering ), एमबीए- MBA आणि एमसीए- MCA असलेल्या महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन परीक्षाविषयक कामे प्रथम सुरू करावी असेही समितीने सुचविले होते. आता त्या व्हायरसची भीती आणि लॉकडाऊन यामुळे ऑनलाईन परीक्षांचे महत्त्व वाढणार आहे. जास्तीत जास्त परीक्षा ऑनलाईनच घेण्याच्या दृष्टीने सरकार आता नियोजन करीत आहे.

ऑनलाईन परीक्षेचे फायदे  | Benefits of online exams

  1. गर्दीपासून सूटका :- महाविद्यालयात होणार्‍या गर्दीपासून विद्यार्थ्यांची सूटका होते.
  2. गैरमार्गांना आळा :- पेपर फूटणे, परीक्षेतील सामुहीक कॉपीसारख्या अनेक गैरमार्गांना आपोआप आळा 
  3. ऑनलाईन परीक्षा कुठेही:- सध्या ऑनलाईन परीक्षा फक्त विशिष्ट ठिकाणीच द्याव्या लागतात. काही खाजगी संस्था आणि दूरस्थ शिक्षण चालविणार्‍या संस्था ऑनलाईन परीक्षा कुठेही घेण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहे. म्हणजेच अशी परीक्षा विशिष्ट केंद्रांवरच जाऊन देण्याऐवजी आपण सायबर कॅफे किंवा योग्य असे इंटरनेटचे कनेक्शन आणि संगणक आपल्या घरी असल्यास घरी बसूनही विशिष्ट वेळेत अशी परीक्षा देता येणार आहे.
  4. विद्यापीठांचा त्रास वाचणार:- प्रश्‍नपत्रिका आणि उत्तरपत्रिका छापून त्या काही दिवस सांभाळण्याचा विद्यापीठांचा त्रास वाचणार आहे.
  5. माहितीच्या अधिकारात उत्तरपत्रिकेची प्रत:- विद्यार्थ्याने माहितीच्या अधिकारात उत्तरपत्रिकेची प्रत मागितल्यास अशी प्रत त्याला लगेच देता येईल किंवा विशिष्ट शुल्क भरल्यावर अशी प्रत त्याला संबधित वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल.
  6. नियमांची अंमलबजावणी सोपी :- सद्या त्या व्हायरसने सर्वांची भीती वाढवली आहे. सोशल डिस्टन्सींगच्या नियमामुळे आणि शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आग्रहामुळे नेहमीच्या परीक्षा घेणे कटकटीचे असते, त्याऐवजी ऑनलाईन परीक्षा घेणे सोपे जाते.  
  7. प्रवासाची गरज नाही : परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे परीक्षा केंद्रावर किंवा संबंधित शहरात जाऊन विशिष्ट शाळेत जायची गरज नाही. प्रवास करायची आवश्यकता नाही. प्रत्येकाला त्याच्या शहरातच परीक्षा देता येईल. ऑनलाइन परीक्षा त्या त्या विशिष्ट शहरात जाऊन देण्यापेक्षा आपल्याच शहरातील केंद्रात देता येते. त्यामुळे प्रवासाचा खसरच आणि वेळ वाचतो.
  8. खर्च बचत: ऑनलाइन परीक्षांमुळे संस्था आणि सहभागी दोघांच्याही खर्चात बचत होते. ऑनलाइन परीक्षांमुळे छापील साहित्य आणि प्रवासाशी संबंधित खर्च कमी होतो. संभाव्य निवास खर्चही वाचवता येतो.  
  9. वेळेची कार्यक्षमता: ऑनलाइन परीक्षांमध्ये अनेकदा नोंदणी, परीक्षेच्या पेपरचे वितरण आणि ग्रेडिंगसाठी स्वयंचलित प्रक्रिया असतात. यामुळे परीक्षा आयोजक आणि सहभागी दोघांचाही वेळ वाचतो. 
  10. झटपट रिझल्ट : ऑनलाइन परीक्षा पूर्ण झाल्यावर सहभागींना त्वरित निकाल देता येतो.

ऑनलाईन परीक्षा पद्धतीच्या मर्यादा | Limitations of online examination method

१) परीक्षेची एकच वेबसाईट अनेक जिल्ह्यांसाठी/ संपूर्ण राज्यासाठी किंवा देशासाठी कार्यरत असते. एरव्ही अतिशय सुरळीतपणे सेवा देणारी वेबसाईट परीक्षेच्या वेळी नेमकी अचानक हँग होते.
२) परीक्षेची वेबसाईट परीक्षा सुरू असतांना अनेक वेळा खूप हळू हळू प्रतिसाद देते.
३) परीक्षा देतांना अचानक लाईट गेल्यास किंवा इंटरनेटची लिंक न मिळाल्यास विद्यार्थ्याची धांदल उडू शकते. असे प्रकार अनेक ठिकाणी झाल्याच्या वर्तमानपत्रात बातम्या नेहमी वाचायला मिळतात.
४) ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थी प्रतिसाद देत असले तरी अनेक विद्यार्थ्यांना अशी परीक्षा कटकटीची वाटते. संगणकाचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे अनेक विद्यार्थी हुशार असूनही ऑनलाईन परीक्षेत गोंधळू शकतात आणि त्यांना अपेक्षित निकालापासून दूर जाऊ शकतात.
५) अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही, संगणक हाताळण्याचे ज्ञान नाही, असे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेसाठी कसे तयार करावे, अशी चिंता शासनाला आहे.

ऑनलाईन परीक्षा कशी द्यावी? | How to face the exam online?

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेचा अजिबात बाऊ करून घेऊ नये, कारण एमएससीआयटीची ऑनलाईन परीक्षा अनेक विद्यार्थ्यांनी या अगोदर दिलेली असेलच, तशीच परीक्षा फक्त थोड्याफरकाने विद्यापीठाची/सबंधित बोर्डाची असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देण्याची वेगवेगळ्या संस्थांमध्ये पद्धत वेगळी असते. अशी परीक्षा कशी द्यावी याबाबत माहितीपत्रक संबधित वेबसाईट किंवा संस्थेकडून प्राप्त करून घ्यावे. साधारणत: ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी खालील टप्प्यांमधून जावे लागेल. 

ऑनलाईन परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन | Registration for online exam-

  • सदर अभ्यासक्रमासाठी आपण ऑनलाईन अर्जाने प्रवेश घेतला असेल तर आपणाला प्रवेश घेतल्यानंतर पीआरएन ( पर्मनंट रजिस्टर नंबर) मिळाला असेल. त्या नंबरच्या सहाय्याने सबंधित वेबसाईटवर जाऊन आपली वैयक्तिक माहिती भरून आपला अभ्यासक्रम आणि विषय, कोर्स रजिस्टे्रशन लिंकवरू जाऊन रजिस्टर करणे.
  • वेैयक्तिक माहितीमध्ये आपणाला नाव, पत्ता, फोन, आई आणि वडिलांचे नाव, जात-पोटजात, कोणत्या वर्षाला शिकत आहे, प्रवेश कधी घेतला आदी माहिती भरावी लागेल. खरे तर प्रवेश याच वेबसाईटच्या द्वारे ऑनलाईन पद्धतीने झालेला असल्यास यातील बरीच माहिती बायडिफॉल्ट अगोदर तेथे दिसेल.
  • विद्यार्थी म्हणून सर्व माहिती भरून झाल्यावर एक्झाम रजिस्ट्रेशन लिंक वर जाऊन तेथील माहिती भरावी. याठिकाणी निवडलेला अभ्यासक्रम, विषय, परीक्षा फी, अभ्यासक्रमाचे वर्ष किंवा सेमीस्टर आदी माहिती भरावी लागते.
  • इतर सर्व माहिती भरून झाल्यावर परीक्षेसाठीचा आपला यूजरआयडी आणि पासवर्ड निर्माण करण्यासाठी संबधित लिंकवर जाऊन योग्य ती माहिती भरावी. आपल्याला मिळालेला यूजरआयडी आणि पासवर्ड जपून ठेवावा. तो इतरांना सांगू नये.
  • परीक्षेच्या वेळेस विहित केंद्रावर जाऊन आपणास मिळालेल्या यूजरआयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉग ईन करावे. योग्य ती माहिती भरल्यावर प्रश्‍नपत्रिका समोर येईल. परीक्षा झाल्यावर प्रत्येकवेळी लॉग आउट करायला विसरू नये.
  • काही संस्थांमध्ये थोड्या फरकाने ऑनलाईन परीक्षा देण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात, परंतु पद्धती कशीही असली तरी वरील टप्प्यांमधून विद्यार्थ्यांना मात्र जावेच लागणार आहे. 

डेमो परीक्षा / सराव परीक्षा | Demo Exams

ऑनलाईन परीक्षा सर्वांना नवीन आहे. हे संबंधित बोर्ड / विद्यापीठ / परीक्षा मंडळ यांना माहीत आहे. म्हणून अशा संस्था डेमो परीक्षा देण्यासंबंधी संबंधित वेबसाईटवर व्यवस्था करतात. अशा डेमो परीक्षा विद्यार्थ्यांनी आवर्जून द्यायला हव्या. त्यामुळे त्यांची खर्‍या ऑनलाईन परीक्षेची भीती कमी होईल.

ऑनलाईन परीक्षा समस्या आणि समाधान | Online Exam Problems and Solutions-

१) वेबसाईट हँग होणे / वीज नसणे | Website hangs / no power:

अशा समस्यांमुळे ज्यांना परीक्षा देता आली नाही, त्यांना आणखी एक दिवस संबंधित परीक्षा देण्यासाठी एक दिवस राखीव ठेवणे. अशा परीक्षेची प्रश्‍नपत्रिका वेगळी असावी.

२) ऑनलाईन परीक्षा देण्यासंबंधी कोर्स | Online Examination Course

ऑनलाईन परीक्षा कशी द्यावी, काय तयारी करावी, ऐनवेळी समस्या आली तर कोणते उपाय करावे? यासबंधी सर्व माहिती परीक्षा मंडळाने वेबसाईटवर प्रकाशित करावी. डेमो परीक्षेचेही व्यवस्था करावी. शक्य झाल्यास ऑनलाईन परीक्षा कशी द्यावी, या सबंधी शॉर्ट टर्म कोर्स उपलब्ध करावा.

निष्कर्ष ( Conclusion)-

नीट विचार केला तर ऑनलाईन परीक्षा खरेतर फायदेशीर आहे. कुठेही दुसऱ्या शहरात न जाता आपल्याला आपल्या शहरातील केंद्रावर परीक्षा देता येत असेल तर त्याचे स्वागत केलेच पाहिजे. ऑनलाईन परीक्षेचे फायदे व तोटे पाहिलेतर फायदे तर वादात नाहीच, तोट्यांवर दिलेल्या समस्या अभ्यासून त्यांना सामोरे गेले पाहिजे. 

- योगेश रमाकांत भोलाणे
Read more about author

---------------------------------
हे सुद्धा वाचा-

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने

इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या