मुलाखत देतांना
मुलाखतीसाठी पूर्वतयारी, पोशाख, अपडेटेड रेझ्युम यांची जशी आवश्यकता असते, त्याचप्रमाणे मुलाखत देतांनाही काही बाबींचा विचार करणे आवश्यक असते. कारण या बाबींवर आपण गांभीर्याने विचार न केल्यास इतर सर्व बाबींची तयारी त्यापुढे फिकी पडू शकते.
- कंपनीच्या आवारात प्रवेश केल्यावर
- मुलाखतीच्या रूममध्ये प्रवेश
- मुलाखत सुरू झाल्यावर
- नोकरीच्या मुलाखतीदरम्यान या गोष्टी करू नका
- निष्कर्ष
मुलाखतीसाठी कंपनीच्या आवारात प्रवेश केल्यावर | Upon entering the company premises for an interview
खरे तर तुमची मुलाखतीची प्रक्रिया कंपनीच्या आवारात आल्यापासूनच सुरू होते. कारण तुमच्या प्रत्येक हालचालींवर कंपनीतील कर्मचार्यांची नजर असते. त्यामुळे कंपनीच्या आवारात प्रवेश केल्यावर प्रत्येकाशी सभ्यतेने वागावे. सर्वात प्रथम आपला मोबाईल स्वीच ऑफ करावा आणि आपण आल्याची सूचना रिसेप्शनीस्टला द्यावी. कंपनीचा इतिहास, ध्येय, मूल्ये, उत्पादने किंवा सेवा आणि अलीकडील बातम्यांबद्दल जाणून घ्या. कंपनी समजून घेतल्याने तुमची खरी आवड आणि उत्साह दिसून येईल.
मुलाखतीच्या रूममध्ये प्रवेश | Admission to the interview room
- मुुलाखतीच्या केबीनमध्ये जातांना आपली टाय वगैरे ऍडजस्ट करू नका तसेच शर्ट इन नीट करण्याच्या भानगडीतही पडू नका. खरे तर हे सर्व आधीच व्यवस्थित करून ठेवा.
- मुलाखतीसाठी रूममध्ये जाताच सर्व मुलाखत घेणार्या व्यक्तींशी हस्तांदलोन करा. हस्तांदोलन करतांना तुमचे नाव सांगा. मुलाखत घेणार्या मान्यवरांमध्ये एखादी महिला असल्यास तिलाही आवर्जून नमस्कार करा. अनेक कंपन्यांमध्ये मुलाखतीसाठी मोजक्याच लोकांना ठराविक वेळी बोलावितात. त्यामुळे तुम्हाला थेट मुलाखतीच्या खोलीत बसविले जाऊ शकते. म्हणजेच मुलाखत घेणार्या मान्यवरांच्या आधीच तुम्ही खोलीत बसलेले असाल तर ते खोलीत आल्यावर लगेच ऊभे राहा आणि हस्तांदोलनासाठी आपला हात पुढे करा.
- मुलाखतीच्यावेळी हस्तांदोलन झाल्यावर मुलाखत घेणार्यांनी बस म्हटल्याशिवाय किंवा बसण्याची परवानगी घेतल्याशिवाय बसू नये.
- मुलाखत सुरू झाल्यावर तेथे कुठल्याही चहापानाला नम्रतेने नकार द्या. तसेच अशा बाबींना नकार देतांना तुम्ही चहा किंवा कॉफी पीतच नाही अशीे उत्तरे देऊ नका.
- तुमच्या सोबत ब्रीफकेस असल्यास ती तुमच्या खुर्चीखाली ठेवावी. मुलाखतीला बसले असतांना आपले हात छातीवर घडी घालून ठेवू नका, तसेच पाय क्रॉस करून बसू नका. अशा बाबींमुळे मुलाखतीला तुम्ही घाबरत असल्याचा अंदाज मुलाखत घेणारे करू शकतात.
- तुमच्या रेझ्युमेवर तपशीलवार चर्चा करण्यासाठी तयार रहा. विशिष्ट कामगिरी, अनुभव आणि कौशल्ये हायलाइट करा जी स्थितीशी संबंधित आहेत.
मुलाखत सुरू झाल्यावर | When the interview begins
- मुलाखत घेणार्या व्यक्तीचा प्रश्न पूर्ण ऐकल्यावरच उत्तर द्या. त्यांना मध्येच अडवू नका. प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हमखास माहीत असल्यास त्याचे उत्तर देतांना घाईघाईत उत्तर देऊ नका. तसेच किती सोप्पा प्रश्न विचारला असे म्हणूही नका. तसेच प्रश्नाचे नेमके उत्तर स्पष्ट आवाजात द्या.
- मुलाखतकाराचे प्रश्न काळजीपूर्वक ऐका जेणेकरून ज्यांनी प्रश्न विचारला त्यांचेकडे बघूनच उत्तर देता येईल.
- उत्तरे देतांना नजर प्रश्नकर्त्याकडे ठेवा. मुलाखत देतांना प्रत्येक उत्तरातून तुमचा आत्मविश्वास दिसला पाहिजे.
- तुम्ही समस्या सोडवण्याकडे कसे बघता यावर चर्चा करण्यासाठी तयार रहा. नियोक्ते सहसा अशा उमेदवारांना महत्त्व देतात जे गंभीरपणे विचार करू शकतात आणि प्रभावी उपाय शोधू शकतात.
- एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसल्यास तसे सांगा, खोटे उत्तर देण्याचा प्रयत्न करू नका.
- एखादा प्रश्न समजला नसेल तर प्रश्न पुन्हा सांगण्याची विनंती करा.
- तसेच मुलाखत सुरू झाल्यावर काही वेळा मुलाखत घेणारे आपापसात चर्चा करतात, अशावेळी टेबलवरील वस्तुंशी जसे पेपरवेट खेळू नका. भींतीवर घडाळ्यात किती वाजले, कोणाचे चित्र लावले आहे, अशा बाबींवर लक्ष केद्रींत करण्याचे टाळा. तसेच आपल्या मनगटातील घडाळयात किती वाजले अशी बघण्याची क्रिया करू नका.
- तुम्हाला सदर जॉबसंबधी अनुभव असल्यास पूर्वीची कंपनी का सोडली किंवा का सोडत आहात, अशा प्रश्नांना उत्तरे देतांना पूर्वीच्या कंपनीविषयी वाईट बोलण्याचे टाळा. अशी प्रश्ने विचारली जाऊ शकतात, तेव्हा काय समर्पक उत्तर द्यायचे, हे अगोदर ठरवून ठेवा.
- या कंपनीत नोकरी स्विकारल्यावर तुम्हाला नंतर जास्त पगाराच्या नोकरीची ऑफर आल्यास तुम्ही ती स्विकारणार का? तूमची या या ठिकाणी बदली केल्यास तुम्ही जाणार का? ठरविल्यापेक्षा जास्त काम करावे लागत असेल तर तुम्ही कराल का? सुटीच्या दिवशी कामावर बोलाविले तर तुम्ही याला का? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, याची उत्तरे कशी द्यावीत हे अगोदरच ठरवून घ्या.
- संपूर्ण मुलाखतीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. संधी आणि कंपनीबद्दल उत्साह व्यक्त करा.
- तुमची कौशल्ये आणि कृत्ये स्पष्ट करण्यासाठी तुमच्या मागील अनुभवांमधील विशिष्ट उदाहरणे वापरा. जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमच्यात असलेल्या चांगल्या बाबींचा उल्लेख करा.
- मुलाखत संपल्यावर मुलाखत घेणार्या व्यक्तींना शेवटी धन्यवाद म्हणायला विसरू नका.
नोकरीच्या मुलाखतीदरम्यान या गोष्टी करू नका | Don't do these things during a job interview
- उशीरा पोहोचणे: मुलाखतीसाठी वेळेवरच हजर अतिशय महत्त्वाचे आहे. वक्तशीरपणा केव्हाही आणि कधीही महत्त्वाचा ठरतो. मुलाखतीसाठी उशीरा येण्याने मुलाखतकारावर नकारात्मक प्रभाव निर्माण होऊ शकतो आणि मुलाखतकाराच्या वेळेचा आदर नसणे सुचवू शकते.
- अपुरे संशोधन: सबंधित कंपनी, तिचे कार्य आणि आपल्यासाठी सादर केले पद याबाबत आपणाकडे पुरेशी माहिती नसल्यास आपणास नोकरीमध्ये रस नाही असे कंपनीला वाटू शकते. म्हणून कंपनीची मूल्ये, उत्पादने/सेवा आणि अलीकडील अपडेट्स आपणाला माहिती असणे गरजेचे आहे.
- अयोग्य कपडे घालणे: मुलाखतीसाठी प्रोफेशनल कपडे घाला. कामाच्या ठिकाणच्या संस्कृतीशी जुळणारे नसलेले जास्त कॅज्युअल किंवा आकर्षक पोशाख मुलाखतीसाठी टाळा.
- खराब शारीरिक भाषा ( bad body language) : आय कॉन्टॅक्ट नीट ठेवा, घट्ट हँडशेक द्या आणि सरळ बसा. कारण नसतांना वाकणे, आपल्या हातांची अयोग्य हालचाल आणि इतर नकारात्मक देहबोली प्रदर्शित करणे टाळा.
- खूप किंवा खूप कमी बोलणे: मुलाखत देतांना पुरेसा सवांद आवश्यक असला तरी खूप जास्त बोलू नका. पुरेशी माहिती सादर कार आणि अनावश्यक तपशील टाळा. तुमच्या प्रतिसादांमध्ये संक्षिप्त रहा, विचारले त्याचेच उत्तर द्या आणि तुमची उत्तरे मुलाखतकाराच्या प्रश्नांना संबोधित करतात याची खात्री करा.
- मुलाखतकाराला व्यत्यय आणणे: उत्तर देण्यापूर्वी मुलाखतकाराला त्यांचे प्रश्न पूर्ण करू द्या. मध्येच बोलणे, प्रश्न विचारतांना व्यत्यय आणणे असभ्य मानले जाऊ शकते.
- अयोग्य भाषा वापरणे: तुमची भाषा व्यावसायिक ठेवा आणि अपशब्द किंवा अयोग्य भाषा वापरणे टाळा. लक्षात ठेवा की कार्यालयीन कामकाजाचा मुलाखत हा एक औपचारिक भाग आहे.
- सामान्य उत्तरे प्रदान करणे : विशिष्ट नोकरीशी संबंधित तुमची कौशल्ये आणि अनुभव प्रदर्शित करण्यासाठी तुमचे उत्तरे तयार ठेवा. सामान्य उत्तरे की कोणत्याही स्थितीत लागू होऊ शकतात, अशी वापरणे टाळा.
- मागील नोकरीबद्दल नकारात्मक बोलणे : मागील नियोक्ता किंवा सहकाऱ्यांबद्दल नकारात्मक बोलणे टाळा. सकारात्मक अनुभवांवर लक्ष केंद्रित करा आणि यावरच चर्चा करा.
- उत्साहाचा अभाव: आपण ज्या पदासाठी नोकरीसाठी आला आहात त्या पदाबाबत आणि कंपनीसाठी उत्साह दाखवा. उत्साहाच्या कमतरतेमुळे तुम्हाला संधीत रस नाही असे वाटू शकते.
- अतिउत्साह: विकन्सबद्दल विचारल्यास, "मी एक परिपूर्णतावादी आहे" सारखी उत्तरे देणे टाळा. स्वतःमधील सुधारणांबद्दल प्रामाणिक रहा आणि त्यावर मात करण्यासाठी तुम्ही उचललेल्या पावलांवर चर्चा करा.
- पाठपुरावा दुर्लक्षित करणे: मुलाखतीनंतर पाठपुरावा करण्यात अयशस्वी झाल्यास सौजन्याचा अभाव सूचित होऊ शकतो. म्हणून मुलाखतीच्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि या स्थितीत तुमची स्वारस्य पुन्हा सांगण्यासाठी मुलाखतीनंतर धन्यवाद ईमेल किंवा नोट जरूर पाठवा.
निष्कर्ष ( Conclusion)-
नोकरी मिळविण्यासाठी, नोकरी बदलतांना किंवा नोकरीत बढती मिळवितांना अशी अनेकवेळा मुलाखत द्यावी लागते. मुलाखत देतांना कसे बोलावे, कसे वागावे, काय करावे आणि काय करू नये याबाबत प्रस्तुत लेखात दिलेल्या माहितीचा जरूर विचार करावा. लक्षात ठेवा की प्रत्येक मुलाखत ही तुमची कौशल्ये आणि पात्रता प्रदर्शित करण्याची संधी असते. तयारी ही महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे कंपनीला समजून घेण्यासाठी, तुमचे प्रतिसाद सुधारण्यात आणि शक्य असल्यास मित्र किंवा मार्गदर्शकासह सराव करण्यात वेळ घालवा. आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन एक मजबूत छाप पाडण्यासाठी फार महत्त्वाची ठरू शकते.
- योगेश रमाकांत भोलाणे
हे सुद्धा वाचा-
आपण दिलेली मुलाखतची माहीती नवीन कामवर रहानाऱ्या उमेदराना उपयुक्त
उत्तर द्याहटवा