तणांमध्ये तणनाशकप्रतिकारक गुणधर्म-एक जागतिक समस्या | Weedicide resistence properties in weed- a global problem

Weedicide resistence properties in weed- a global problem
weeds-weedicides

तणांमध्ये तणनाशकप्रतिकारक गुणधर्म - एक जागतिक समस्या

तणनाशके वापरणे फायदेशीर असले तरीही परदेशात अलिकडे रासायनिक तणनाशकांबाबत अतिशय गंभीर समस्या जाणवू लागली आहे, ह्या समस्येकडे वेळीच लक्ष जर दिले गेले नाहीतर संपूर्ण जगाला ह्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी पारंपारिक पद्धतीने म्हणजे निंदणी, कोळपणी इत्यादीचा संयुक्त वापर करून तणांचा बंदोबस्त करतात. परंतु अलिकडे मजुरीचे दर खूप वाढलेले आहेत आणि जास्त मजुरी देऊनही मजूर वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आंतरमशागतीचा खर्च वाढतो आणि वेळेवर तणांचे नियंत्रणही होत नाही. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी रासायनिक पद्धतीने तणांचे नियंत्रण सुरू केले आहे. परंतु रासायनिक पद्धतीने तणांवर नियंत्रण केल्यामुळे एक नवीनच समस्या उदभवण्याची शक्यता आता परदेशातील शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. भारत सरकारलाही ही समस्या गंभीरपणे घ्यावी लागणार आहे. 

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे
  • तणनाशके
  • तणनाशके गट
  • तणनाशकांचे फायदे
  • तणनाशके वापरणे फायदेशीर पण...
  • तणनाशकांचे तोटे
  • निष्कर्ष

तणनाशके|Herbicides    

तणांचा नाश करण्यासाठी किंवा तणांची वाढ रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांना तणनाशके असे म्हणतात. ( Chemicals used to kill weeds or prevent the growth of weeds are called herbicides. ) अशा रसायनांचा उपयोग करून तण नियंत्रणाला कमी कालावधी लागतो आणि खर्चही कमी येतो. तणनाशकांच्या वापरामुळे पिकाची उगवण, वाढ आणि विकास तणविरहित वातावरणात झाल्याने पीक उत्पादनात वाढ होते. खरीप हंगामात वापसा न मिळाल्यामुळे भांगलणी किंवा मशागतीची कामे वेळेवर करता येत नाही आणि इतर पद्धतींनी तणांचे नियंत्रण करता येत नाही, अशावेळी तणनाशकाचा वापर परिणामकारक ठरतो. तसेच अरूंद पिकांच्या ओळीतील आणि एकाच ओळीतील दोन रोपांमधील जागेतील तण यांत्रिक पद्धतीने काढणे कठीण असते, अशावेळी रासायनिक तणनाशके तणांपर्यंत पोहोचून त्यांचा बंदोबस्त करतात. रासायनिक तणनाशकांद्वारे तणांचे नियंत्रण करण्याचे असे अनेक फायदे आहेत. परंतु एकच तणनाशक सरसकट सर्व पिकांसाठी वापरता येत नाही. कारण विविध पिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची तणे येतात. ह्यासाठी पिकांच्या आणि तणांच्या प्रकारानुसार वेगवेगळी तणनाशके फवारून तणांचा बंदोबस्त करायचा असतो.

तणनाशके  गट | Types of Herbicides  

"तणनाशके" हा शब्द सामान्यतः तणनाशके किंवा तणनाशकांचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो. तणनाशके हे रासायनिक पदार्थ आहेत जे तण वनस्पती नियंत्रित करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी वापरले जातात. तणे पोषण, पाणी आणि सूर्यप्रकाशासाठी मुख्य पिकांशी स्पर्धा करतात, त्यामुळे त्यांचे वेळीच वयःस्थापन करणे गरजेचे असते. तसेच तणनाशकांच्या वापरावरून त्याचे प्रमुख तीन गट पडतात, जसे उगवण्यापूर्वी वापरायचे तणनाशके आणि तण उगवल्यानंतर वापरायचे तणनाशके, निवडक तणनाशके आणि बिन निवडक तणनाशके, स्पर्शजन्य तणनाशके आणि आंतरप्रवाही तणनाशके. आपल्या देशात गेल्या दशकापासून तणनाशकांचा वापर करण्यामागे शेतकऱ्यांचा कल दिसू लागला आहे. बरेच शेतकरी अतिशय काळजीपूर्वक आणि नियोजनपूर्वक तणनाशकांचा वापर करतांना दिसत आहेत. परंतु अजुनही केवळ तणनाशकांचा शंभर टक्के वापर करणारे शेतकरी खूप कमी आहे. परदेशात तणनाशकांचा वापर आपल्या तुलनेने खूप जास्त आहे. परदेशात बऱ्याच ठिकाणी फक्त रासायनिक तणनाशकांद्वारेच तणांचा बंदोबस्त केला जातो. 

तणनाशकांचे फायदे । Advantages of herbicides

तणनाशके वापरण्याचे काही संभाव्य फायदे खालील प्रमाणे :

  • तण नियंत्रण: तण पोषक, पाणी आणि सूर्यप्रकाशासाठी पिकांशी किंवा इच्छित वनस्पतींशी स्पर्धा करू शकतात, ज्यामुळे एकूण उत्पादकता कमी होते. तणांच्या वाढीचे नियंत्रण आणि व्यवस्थापन करणे हा तणनाशकांचा प्राथमिक उद्देश आहे. 
  • वाढलेले पीक उत्पादन: तणांची वाढ नष्ट करून तणनाशके स्पर्धा कमी करून पिकांची भरभराट होण्यास मदत करतात. यामुळे पीक उत्पादनात वाढ होऊ शकते आणि एकूणच कृषी उत्पादकता वाढू शकते.
  • खर्च कार्यक्षमता: हाताने तण काढणे किंवा तण नियंत्रणाच्या इतर पद्धतींच्या तुलनेत तणनाशके वापरणे किफायतशीर ठरू शकते. यासाठी कमी श्रम लागतात. 
  • वेळेची बचत: तणनाशके हाताने तण काढण्याच्या तुलनेत वेळ वाचवू शकतात, ज्यामुळे शेतकरी इतर महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकतात. 
  • अर्जामध्ये अचूकता: बर्‍याच तणनाशके निवडक लक्ष्यीकरणासाठी (selective targeting) डिझाइन केलेली आहेत, याचा अर्थ ते मुख्य पिके किंवा वनस्पतींवर परिणाम न करता विशिष्ट प्रकारच्या तणांना नष्ट करतात. 
  • जमिनीतील ओलावा संवर्धन: पाण्यासाठी पिकांशी स्पर्धा करून तण जमिनीतील ओलावा कमी करतात. तणनाशकांच्या सहाय्याने तण नियंत्रित केल्याने जमिनीतील ओलावा वाचवता येतो.
  • तणांचा प्रसार रोखणे: तणनाशके अतिशय हानिकारक (invasive or noxious weeds) तणांचा प्रसार रोखू शकतात. 

तणनाशके हे फायदे देत असताना, संभाव्य तोटे आणि पर्यावरणीय परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे. तणनाशकांवर अत्याधिक अवलंबनामुळे पानांमध्ये तणनाशक-प्रतिरोधक गुणधर्म वाढू शकतो.

तणनाशके वापरणे फायदेशीर पण... (Weedicies are beneficial but...)

तणनाशके वापरणे फायदेशीर असले तरीही परदेशात अलिकडे रासायनिक तणनाशकांबाबत अतिशय गंभीर समस्या जाणवू लागली आहे, ह्या समस्येकडे वेळीच लक्ष जर दिले गेले नाहीतर संपूर्ण जगाला ह्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कारण एका संशोधनाअंती अमेरिकेत आणि ऑस्ट्रलियात आता काही प्रकारच्या तणांमध्ये तणनाशक प्रतिकारक गुणधर्म असल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे तणांची ही तणनाशकांना प्रतिकार करण्याची शक्ती वाढत असल्याचेही दिसून आले आहे. तणांची तणनाशकांना प्रतिकार करण्याची वृत्ती अमेरिकेपेक्षा ऑस्ट्रेलियातील तणांमध्ये जास्त आहे. बहुधा अनेक वर्षांपासून केवळ रासायनिक पद्धतीनेच तणांचा बंदोबस्त केल्याने तेथे ही समस्या वाढत आहे. 
    ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सुरूवातीला बर्न्यार्डग्रास तण आणि ग्लायसोफेट तणनाशक यांच्यामधील संबंध अभ्यासला. रासायनिक तणनाशक-ग्लायफोसेटला प्रतिकार करण्याचे गुणधर्म बर्न्यार्डग्रास या तणात असल्याचे अभ्यासाअंती त्यांनी सिद्ध केले. त्यांच्यामते ही समस्या आता सुरूवातीच्या टप्प्यात असली तरी त्याकडे आताच गंभीरपणे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तेथे आता तणांमधील तणनाशकांना प्रतिकारक करणार्‍या गुणधर्मावर संशोधन सुरू झाले आहे. 
    सुरूवातीच्या संशोधनावर तेथील शास्त्रज्ञांनी तणांच्या बंदोबस्तासाठी फक्त रासायनिक पद्धतीवर अवलंबून न राहता इतर अरासायनिक पद्धती उपयोगात आणण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्या तणांमध्ये तणनाशकविरोधी गुणधर्म आढळले आहेत अशा तणांच्या बियांचा जर इतर ठिकाणी प्रसार झाला तर पुढे ही समस्या आणखी भयानक स्वरूप धारण करू शकते कारण भविष्यात अशी तणे निर्माण होतील की त्यांचा बंदोबस्त तणनाशकांद्वारे होणे शक्य होणार नाही, हे लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियात विशिष्ट तणांच्या बियांचा प्रसार रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. 

तणनाशकांचे तोटे | Disadvantages of herbicides

तणनाशकांचा वापर अनेक तोटे आणि संभाव्य कमतरतांसह येतो. कृषी, बागकाम किंवा लँडस्केपिंगमध्ये तणनाशके वापरताना तणनाशकांचे तोटेही विचारात घ्यायला हवेत. 

  • पर्यावरणीय प्रभाव: तणनाशकांचा वापर केलेल्या भागातून पाणी वाहून गेल्याने पाणी दूषित होऊ शकते, ज्यामुळे जलीय परिसंस्था प्रभावित होतात.
  • लक्ष्य नसलेले वनस्पती नुकसान: तणनाशके, विशेषत: निवडक नसलेली, मुख्य पीक आणि लक्ष्य नसलेल्या वनस्पतींना हानी पोहोचवू शकतात किंवा नष्ट करू शकतात. यामुळे परिसंस्था आणि जैवविविधतेला बाधा येऊ शकते.
  • अन्न आणि पाण्यात अवशेष: काही तणनाशके पिके, भाजीपाला किंवा पाण्याच्या स्त्रोतांमध्ये अवशेष सोडू शकतात. यामुळे संभाव्यत: तणनाशकांचे अवशेष अंतर्ग्रहण (herbicide residues)  होऊ शकतात, ज्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानवी आरोग्य धोक्यात येऊ शकते. 
  • लक्ष्य नसलेल्या वन्यजीवांवर होणारा परिणाम: कीटक, पक्षी आणि इतर प्राण्यांसह लक्ष्य नसलेल्या वन्यजीवांवर तणनाशकांचा अनपेक्षित परिणाम होऊ शकतो. काही तणनाशके विशिष्ट प्रजातींसाठी विषारी असू शकतात. 
  • मातीच्या आरोग्याची चिंता: तणनाशकांचा सतत वापर केल्याने सूक्ष्मजीव समुदाय आणि पोषक सायकलिंगवर परिणाम होऊन मातीच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊन माती नापीक बानू शकते. यामुळे जमिनीच्या एकूण सुपीकतेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.
  • संभाव्य आरोग्य धोके: काही तणनाशकांच्या दीर्घकाळापर्यंत संपर्कात राहिल्याने शेतकऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. तणनाशके त्वचेच्या संपर्कातून, इनहेलेशनद्वारे शरीरात प्रवेश करू शकतात.

हे तोटे कमी करण्यासाठी, तणनाशक वापरासाठी योग्य पद्धती, शिफारस केलेल्या डोसचे पालन आणि पर्यायी तण व्यवस्थापन धोरणांचा विचार यासह तणनाशकांच्या वापरासाठी सर्वोत्तम पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे. 

निष्कर्ष ( Conclusion)-

कारण अगोदरच रासायनिक तणनाशकांचा वापर फार काळजीपूर्वक करावा लागतो, त्यात थोडे जरी दुर्लक्ष झाले तर अपेक्षित परिणाम मिळत नाही. त्यात तणांमध्ये तणनाशक प्रतिकारक गुणधर्म निर्माण झाल्यास त्याचे फार मोठे परिणाम भारतीय शेतीवर होऊ शकतात. भारतीय तज्ज्ञांनी या बाबीवर फार गंभीरपणे लक्ष ठेवायला हवे. आताच शेतकऱ्यांनी काही अंशी रासायनिक तणनाशकांचा वापर करायला सुरुवात केली आहे, त्यात ही नवीन समस्या अडथळा आणू शकते. भारतात मात्र अशी समस्या उद्भवल्याचे उदाहरण नसले तरी तणांमध्ये तणनाशक प्रतिकारक गुणधर्म या समस्येवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. तसेच ही समस्या गंभीरतेने घेऊन त्यावर संशोधन सुरू केले तर आपला देश या समस्येपासून मुक्त राहू शकेल.

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने

इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या