अन्ननासाडीवर कायदा हाच एकमेव उपाय | Law is only solution to food wastage

Law is only solution to food wastage
Food Wastage

अन्ननासाडीवर कायदा हाच एकमेव उपाय

ज्या देशातील संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म: म्हटले आहे, अशा देशात दरवर्षी ५८ हजार कोटी रूपयांचे अन्न फेकून दिले जाते, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. विशेष म्हणजे ही अन्नाची नासाडी उच्च शिक्षित आणि श्रीमंत लोकांमुळेच होत आहे, तेव्हा सरकारने जनजागृती किंवा वर्तमान पत्रात आहावन अशा बालिश उपाय याजेना केल्यापेक्षा यावर ठोस कायदा निर्माण करण्याची वेळ आता आली आहे.

आपल्या देशात जवळपास ३० कोटी लोकांच्या नशिबात दोन वेळचं अन्न खायला मिळेलच याची गॅरंटी नसते. ज्या देशात गरीब व्यक्ती मुलांचं पोट भरण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतो, ज्या देशातील संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म: म्हटले आहे, अशा देशात दरवर्षी ५८ हजार कोटी रूपयांचे अन्न फेकून दिले जाते, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. विशेष म्हणजे ही अन्नाची नासाडी उच्च शिक्षित आणि श्रीमंत लोकांमुळेच होत आहे, तेव्हा सरकारने जनजागृती किंवा वर्तमान पत्रात आवाहन अशा बालिश उपाय योजना केल्यापेक्षा यावर ठोस कायदा निर्माण करण्याची वेळ आता आली आहे.

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे

  • अन्न नासाडीची कारणे
  • अन्ननासाडी थांबविण्याचे उपाय
  • निष्कर्ष

अन्न नासाडीची कारणे | Causes of food wastage

अन्नाची नासाडी ही भारतातील एक महत्त्वाची समस्या असून, दरवर्षी मोठ्या प्रमाणात अन्न वाया जात आहे. भारतातील अन्नाची नासाडी ही अन्न पुरवठा साखळीच्या विविध टप्प्यांवर अनेक कारणीभूत घटकांसह एक जटिल समस्या आहे. भारतातील अन्नाच्या नासाडीची काही मुख्य कारणे येथे आहेत:

काढणीनंतरचे नुकसान:  

साठवणुकीच्या अपुर्‍या सुविधा, वाहतुकीच्या पायाभूत सुविधांचा अभाव आणि हाताळणीच्या खराब पद्धतींमुळे काढणीनंतरचे महत्त्वपूर्ण नुकसान होते. फळे आणि भाजीपाला विशेषतः वाहतूक आणि साठवणुकीदरम्यान खूप मोठ्या प्रमाणावर खराब होतात.

पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक आव्हाने: 

वाहतूक सुविधा,  पायाभूत सुविधा, शीतगृह सुविधा आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी या सर्वांच्या  कमतरतांमुळे नाशवंत मालाचा वाहतुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. 

कोल्ड स्टोरेज सुविधांचा अभाव:  

कोल्ड स्टोरेज सुविधा उपलब्ध असल्यातरी पुरेशा प्रमाणात नाहीत. विशेषतः ग्रामीण भागात, फळे, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांसह नाशवंत वस्तूंची नासाडी होते. 

बाजारातील अपूर्णता: 

बाजारपेठेतील माहितीचा अभाव, किमतीतील चढउतार आणि बाजारातील अपुरे कनेक्शन यामुळे अन्नाची नासाडी होऊ शकते. कारण शेतकरी त्यांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ अनेकवेळा शोधू शकत नाही. 

अन्न प्रक्रिया आणि संरक्षणाचा अभाव: 

अपुर्‍या अन्न प्रक्रिया आणि संरक्षण सुविधांमुळे शेतमाल खराब होण्याची शक्यता जास्त असते. नाशवंत अन्नपदार्थांवर प्रक्रिया आणि जतन करण्याच्या तंत्रज्ञानाचा अभाव नुकसानीस कारणीभूत ठरतो.

अपुरी पॅकेजिंग: 

अपुरी किंवा अयोग्य पॅकेजिंगमुळे वाहतूक आणि स्टोरेज दरम्यान अन्न उत्पादनांचे नुकसान होऊ शकते. अन्नाचे भौतिक नुकसान आणि दूषिततेपासून संरक्षण करण्यासाठी योग्य पॅकेजिंग आवश्यक आहे.

अपुरी अन्न प्रक्रिया युनिट्स: 

आधुनिक आणि कार्यक्षम अन्न प्रक्रिया युनिट्सचा अभाव नाशवंत कृषी उत्पादनांच्या नासाडीस कारणीभूत ठरतो जे अन्यथा प्रक्रिया आणि संरक्षित केले जाऊ शकतात.

अतिउत्पादन आणि अतिवापर : 

अन्न सेवा उद्योगातील विशिष्ट हंगामात अतिउत्पादन, तसेच व्यक्तींचा अतिवापर, अन्नाची नासाडी करण्यास कारणीभूत ठरते. चव न आवडल्यास बिनदिक्कतपणे फेकून देण्याची प्रथा ही अन्नाच्या नासाडीची सामान्य कारणे आहेत.

अपुऱ्या स्टोरेज सुविधा: 

साठवणुकीच्या अपुर्‍या सुविधांमुळे अन्नाची नासाडी  होऊ शकते. योग्य स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चरच्या अभावामुळे अन्न उत्पादनांची नासाडी होऊ शकते, ज्यामुळे अन्नाचे महत्त्वपूर्ण नुकसान होऊ शकते.

सामाजिक आणि सांस्कृतिक घटक: 

सामाजिक आणि सांस्कृतिक घटक, जसे की मोठ्या प्रमाणावर विवाहसोहळे, रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि सामाजिक कार्ये, यामुळे अनेकदा अन्नाची जास्त नासाडी होते. भारतात, इव्हेंट जितका मोठा, तितका प्रचंड कचरा. विवाहसोहळा आणि इतर उत्सवांमुळे मोठ्या प्रमाणात अन्नाचा अपव्यय होऊ शकतो.

जागरूकता आणि शिक्षणाचा अभाव: 

अन्नाची नासाडी कमी करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता आणि शिक्षणाचा अभाव या समस्येस कारणीभूत ठरू शकतो. बर्‍याच लोकांना त्यांच्या कृतींचा अन्नाच्या कचऱ्यावर होणारा परिणाम जाणवू शकत नाही आणि अपव्यय कमी करण्याच्या धोरणांबद्दल त्यांना कदाचित माहिती नसते.

अकार्यक्षम पुरवठा साखळी: 

अन्नाची अयोग्य हाताळणी, वाहतूक आणि साठवणूक यासह पुरवठा साखळीतील अकार्यक्षमतेमुळे अन्नाचे नुकसान आणि नासाडी होऊ शकते. अपुऱ्या पायाभूत सुविधा, कोल्ड स्टोरेज सुविधांचा अभाव आणि खराब रसद यासारख्या समस्या अन्नाची नासाडी करण्यास कारणीभूत ठरू शकतात.

अन्न व्यवस्थापन पद्धतींचा अभाव: 

अयोग्य भोजन नियोजन, भाग नियंत्रण आणि अन्न संरक्षण तंत्रांसह अपुर्‍या अन्न व्यवस्थापन पद्धतींमुळे घरगुती स्तरावर अन्नाची नासाडी होऊ शकते.

आर्थिक घटक: 

महागाई आणि परवडण्यासारखे आर्थिक घटक देखील अन्नाच्या नासाडीस कारणीभूत ठरू शकतात. जेव्हा अन्नाच्या किमती जास्त असतात, तेव्हा लोक आर्थिक अडचणींमुळे किंवा ताज्या उत्पादनांच्या पसंतीमुळे अन्न वाया घालवण्याची शक्यता असते.

लग्न समारंभ | Wedding ceremony 

देशात दरवर्षी मोठ्या थाटात आणि जल्लोषात लग्न समारंभ साजरे केले जातात. दरवर्षी अशा समारंभातून हजारो कोटी रूपयांचे अन्न वाया जाते. खरं तर याला एक प्रकारचा सामाजिक गुन्हाच म्हटले पाहिजे. बफे भोजन असो किंवा पंगती, आयोजक आग्रहाने वाढून जास्तीतजास्त अन्नाची नासाडी कशी होईल याला प्रोत्साहन देण्यासारखाच प्रकार करत असतात. एका सर्व्हेनुसार भारतातील प्रत्येक लग्न समारंभात सुमारे १५ ते २० टक्के अन्नाची नासाडी होत असते. केवळ लग्नातच नव्हे तर हॉटेल-रेस्टॉरंट, खाणावळी, मेस, रूग्णालय, कंपन्यांची कॅटींन येथेही मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाते.

प्रत्येक घरातून अन्नाची नासाडी | Spoilage of food from every household

अनेक घरांमध्ये एकमेकांना आग्रह करून भोजन देण्याची परंपरा आहे. अशा वेळी जास्तीचे भोजन ताटात तसेच शिल्लक राहते. विशेष म्हणजे लहान मुले ताटात बरेच अन्न शिल्लक ठेवतात. एका सर्वेक्षणानुसार भारतातील प्रत्येक घरातून अन्न वाया जाण्याचे प्रमाण सुमारे ५ ते ७ टक्के आहे.

सुपमार्केटमधील ऑफर्स | Offers in the supermarket

भारतातील काही शहरांमध्ये सुपर मार्केट संस्कृती रूजली आहे. अशा ठिकाणी विशिष्ट वस्तुंवर विशिष्ट प्रक्रिया केलेले खाद्य मोफत दिले जाते. असे पदार्थ गरज नसतांना विकत घेतल्यामुळे अशा अन्नाचा पूरेपूर वापर होत नाही. मोफत मिळाल्यामुळे असे अन्न बर्‍याचवेळा फेकून दिले जाते.

साठवणूकीबाबत नसलेले गांभीर्य | Seriousness about storage

भारतात अन्नधान्य साठवणूक अजूनही गांभीर्याने घेतलेली नाही. किरकोळ कारणांमुळे शेकडो टन धान्य खराब होते. काही धान्य वाहतुकीत खराब होते. तसे घराघरातही धान्य साठवणूकीबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक टन धान्य उंदीर किंवा कीडेच फस्त करत असतात.

खुळचट कल्पना | False Concepts

लग्नसमारंभात जेवण दिल्याने अन्नदानाचे पूण्य मिळते, असा अनेक लोकांचा गैरसमज आहे. खरे तर ज्या लोकांची रोज पोटभर भोजन करण्याची कुवत आहे, त्यांना जेवण देऊन कसलेही पूण्य मिळत नसते. वास्तविक जे लोक भूकेले असतात किंवा त्यांच्याकडे रोजच्या भूकेची गरज भागू शकेल एवढेही पैसे नसतात, अशा लोकांना भोजन दिल्यावरच अन्न दानाचे पूण्य मिळत असते. परंतु असे भुकेले लोक पंगतीच्या वेळेस गोळा झाले तर आपण त्यांना हाकलून देतो किंवा त्यांना उष्टे अन्न खायला देतो. जे लोक पोटभर ढोसतात आणि रोजच ताटातील अन्न वाया घालवितात, अशा लोकांना अशा मंगलप्रसंगी भोजन दिल्याने पूण्याच्या ऐवजी पापाच्या वाट्यातच वाढ होत असते, हे आपल्या लोकांना कधी कळेल?

अन्ननासाडी थांबविण्याचे उपाय | Measures to stop food spoilage

नेते, कलाकार, उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्ती यांनी आपल्या समारंभामध्ये फार देखावा करू नये. अन्नाची नासाडी होऊ नये यावर त्यांनी खास लक्ष ठेवावे.

  • अहेरच्या स्वरूपात प्राप्त झालेल्या भेटवस्तू उपयोगात येत नाहीत म्हणून सध्या सनेक लग्नपत्रिकांमध्ये अहेर आणू नये, असे स्षष्ट पणे लिहीले जाते. त्याचप्रमाणे, भोजनात अन्नाची नासाडी करू नये असेही कार्यक्रम पत्रिकेत स्पष्टपणे म्हणावे.
  • शालेय अभ्यासक्रमामध्ये अन्नाच्या नासाडीच्या गंभीर परिणामांबाबत माहिती समाविष्ट करणे. अन्नाच्या नासाडीबाबतचे गांभीर्य लहान वयातच मुलांच्या मनात रूजले तर मोठे झाल्यावर अशी मुले अन्नाची नासाडी करणार नाहीत.
  • अन्नाच्या नासाडीबाबत ठोस स्वरूपाचे कायदे बनविणे. कारण लोकांना आवाहन करणे, जनजागृती करणे हे उपाय सध्याच्या युगात अत्यंत हास्यास्पद ठरत आहेत. कायदा करणे हाच ठोस उपाय आहे.
  • हॉटेल, कॅटींन, होस्टेलमधील मेस अशा ठिकाणी ताटात उष्टे पाडल्यास दंडाची तरतूद ठेवणे.
  • लहान-मोठ्यांच्या सहली प्रेक्षणीय स्थळांसोबत खेडेगावात आणि गरीब वस्तीतही काढाव्यात, शहरातील लोकांना गरीब लोकांची भूक दाखवावी. यामुळे त्यांना खर्‍या परिस्थितीची जाणीव होईल आणि ते अन्न नासाडी करतांना कचरतील.

भूक काय असते, गरीबी काय असते याची कल्पना नसणारे लोक अशा उपायांना कदाचित विरोध करतील. कारण आपली संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ आहे, असे सांगणारे हे महाभागच ताटात थोडेसे अन्न शिल्लक ठेवण्याला सध्या स्टेटस सिम्बॉल समजू लागले आहेत. अध्यात्माच्या नावाखाली होणा ऱ्या अनेक कार्यक्रमांमधूनही भोजनप्रसंगी अन्न वाया जाते, याकडे कुणाचे लक्ष नसते. तेव्हा अन्ननासाडीवर ठोस स्वरूपाचा कायदा हाच उपाय अन्ननासाडी थांबवू शकेल. 

निष्कर्ष ( Conclusion)-

अन्नाच्या नासाडीचा केवळ पर्यावरणावरच परिणाम होत नाही तर अर्थव्यवस्थेवर आणि अन्नसुरक्षेवरही परिणाम होतो. या कारणांना संबोधित करणे आणि जागरूकता, शिक्षण आणि कार्यक्षम अन्न व्यवस्थापन पद्धतींचा प्रचार करणे ही भारतातील अन्नाची नासाडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले आहेत.

- योगेश रमाकांत भोलाणे

Read more about author

---------------------------------
हे सुद्धा वाचा-

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने

इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या