कॅश डिपॉझीट मशिन | Cash Deposit Machine

Cash Deposit Machine
Cash Deposit Machine

कॅश डिपॉझीट मशिन

कॅश डिपॉझिट यंत्रांमुळे बँकेच्या शाखांतून पैसे भरण्यासाठी रांगा लावण्याची गरज नसते. त्याचप्रमाणे बँकेच्या खात्यात पैसे भरण्यासाठी स्लिप भरण्याचीही जरूर भासणार नाही. हे यंत्र बरोबर नोटा ओळखून जमा करणार आहे. कॅश डिपॉझिट मशिन (CDM) हे बँका आणि वित्तीय संस्थांद्वारे ग्राहकांना त्यांच्या खात्यात रोख रक्कम जमा करण्याची सुविधा असलेले स्वयं-सेवा किओस्क आहे.

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे
  • पैसे जमा करण्याचेही मशीन-सीडीएम 
  • कॅश डिपॉझिट यंत्र (सीडीएम)
  • सीडीएम फायदे
  • सीडीएम मध्ये डेबिट कार्डद्वारे पैसे भरण्याची पद्धत
  • सीडीएममध्ये विनाकार्ड पैसे भरण्याची पद्धत
  • रोख ठेव मशीन (CDM) तोटे
  • निष्कर्ष

पैसे जमा करण्याचेही मशीन | Machine to deposit cash

नोटबंदी आपणास आठवत असेलच. मी जेव्हा बँकेत नोटा जमा करायला गेलो तेव्हा बँकेसमोर मोठी रांग होती. काय करावे सुचत नव्हते. तेव्हा जवळच्या एटीममध्ये वेगळे मशिन दिसले. त्याची चौकशी केल्यावर समजले की ते पैसे जमा करण्याचे यंत्र आहे. थोडीशी माहिती घेतल्यावर आणि मशिनसोबत दिलेली मार्गदर्शक तत्त्वे वाचल्यावर मी त्या मशिनमध्ये पैसे जमा केले. इतरांनाही सांगितले की येथे पैसे भरा. पण त्यांना अशी पद्धत गुंतागुंतीची वाटली. पण खरेच मशिनमध्ये पैसे भरणे गुंतागुंतीचे आहे का? याबाबत प्रस्तुत लेखात माहिती दिली आहे. 

बँकांमधील गर्दी कमी करण्यासाठी एटीएम मशिन सुरू करण्यात आलेत. त्यामुळे बँकेत न जाता आणि सुटीच्या दिवशीही पैसे काढता येतात. परंतु पैसे भरण्यासाठी मात्र बँकेत जावे लागतेच. एका सर्वेक्षणानुसार बँकेच्या टेलर काऊंटरवर पैसे भरण्यासाठी सरासरी २० ते ३० मिनिटे लागतात. पैसे भरण्याचे काम करणारे मशिनही उपलब्ध झाले तर हा वेळ देखील ग्राहकांचा वाचू शकतो, याबाबत अनेक वर्षांपासून बंका विचार करीत होत्या. आता त्यावर सीडीएम हा तोडगा सापडला आहे. 

कॅश डिपॉझिट यंत्र (सीडीएम) | Cash deposit machine - CDM

कॅश डिपॉझिट मशिन (CDM) हे बँका आणि वित्तीय संस्थांद्वारे ग्राहकांना त्यांच्या खात्यात रोख रक्कम जमा करण्याची सुविधा असलेले स्वयं-सेवा किओस्क आहे. हे मशीन पारंपारिक काउंटर सेवांच्या गरजेशिवाय रोख ठेवी करण्याचा एक सोयीस्कर आणि कार्यक्षम मार्ग देतात. कॅश डिपॉझिट यंत्रांमुळे बँकेच्या शाखांतून पैसे भरण्यासाठी रांगा लावण्याची गरज नसते. त्याचप्रमाणे बँकेच्या खात्यात पैसे भरण्यासाठी स्लिप भरण्याचीही जरूर भासणार नाही. हे यंत्र बरोबर नोटा ओळखून जमा करणार आहे. कॅश डिपॉझिट मशिन्स सहसा बँक शाखा, एटीएम लॉबी किंवा नियुक्त स्वयं-सेवा क्षेत्रांमध्ये असतात. काही मशीन चोवीस तास उपलब्ध असू शकतात. कॅश डिपॉझिट मशीन चालवणाऱ्या बँकेत ग्राहकांचे सक्रिय बँक खाते असणे आवश्यक आहे. व्यवहारासाठी वापरल्या जाणार्‍या डेबिट कार्डशी देखील खाते लिंक केले पाहिजे.

सीडीएम फायदे | Importance of CDM : 

  • कॅश डिपॉझिट मशिन्स सहसा बँक शाखा, एटीएम लॉबी किंवा नियुक्त स्वयं-सेवा क्षेत्रांमध्ये असतात. काही मशीन चोवीस तास उपलब्ध असतात. ग्राहक कधीही रोख ठेवू शकतात, अगदी नियमित बँकिंग तासांच्या बाहेरही.
  • पारंपारिक बँक काउंटरवर रांगेत थांबण्याच्या तुलनेत रोख ठेव मशीन वापरल्याने वेळ वाचू शकतो.
  • कॅश डिपॉझीट यंत्रात वेगवेगळ्या मूल्याच्या नोटा भरता येतील आणि हे यंत्र मूल्यानुसार बरोबर नोटा ओळखेल. 
  • खात्यात प्रत्यक्ष नोटा जमा करण्यापूर्वी हे यंत्र किती नोटा आहेत, हे ग्राहकाला दाखवून त्याची खात्री पटवून देते. 
  • प्रत्येकवेळी खात्यात रक्कम जमा झाल्यावर ग्राहकाला एक पावती हे यंत्र देते. 
  • शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशीही या यंत्राद्वारे बँक खात्यात ग्राहकाला रक्कम जमा करता येईल. 
  • हे यंत्र व्यवस्थित हाताळता आले तर ग्राहकाला एका मिनिटात संबधित खात्यात पैसे भरता येतील. 
  • रक्कम आपल्या खात्यात जमा करू इच्छिणार्‍या खातेधारकाकडे कार्ड आणि कार्डविरहित व्यवहार असे पर्याय उपलब्ध असणार आहेत. 
  • खातेदाराच्या वतीने दुसरी व्यक्ती पैसे भरण्यास आली, तरीही पैसे जमा होऊ शकतील. 
  • विशिष्ट व्यवहार करतांना दुसऱ्या शहरात मोठी रक्कम मिळाल्यास अशी रक्कम सुरक्षित ठिकाणी नेणे धोकेदायक असते. अशावेळी ही मोठी रक्कम तेथील बँकेत जमा करता येते, पण बँकेच्या वेळेनंतर ही रक्कम कॅश डिपॉझिट मशीनमध्ये (सीडीएम) जमा करता येते आणि मोठी रक्कम हाताळण्याच्या चिंतेतून मुक्ती मिळते.

सीडीएम मध्ये डेबिट कार्डद्वारे पैसे भरण्याची पद्धत | Method of payment by debit card in CDM

  • सीडीएम मध्ये डेबिटकार्ड टाकून नेहमीप्रमाणे पिन क्रमांक टाका.
  • सेव्हींग की करंट असे अकाउंट निवडा. 
  • भरण्यासाठी आणलेले पैस कॅश डिपॉझीट स्लॉट मध्ये ठेवा आणि कंटीन्यू वर क्लिक करा. 
  • सीडीएम आपण ठेवलेले पैसे मोजेल आणि नोटांनुसार एकूण रकमेचे विवरण स्क्रीनवर सादर करेल. सीडीएम मशीन सामान्यत: विविध मूल्यांच्या नोटा स्वीकारते आणि त्यावर प्रक्रिया करते.
  • ते विवरण योग्य असल्यास डिपॉझीट या शब्दावर क्लिक करा. 
  • आपले पैसे जमा झाल्याचा संदेश आपल्याला स्क्रीनवर दिसेल आणि आपल्यास पावती मिळेल. पावतीमध्ये तारीख, वेळ, ठेव रक्कम आणि खात्यातील उर्वरित शिल्लक यासारख्या तपशीलांचा समावेश असतो. 

सीडीएममध्ये विनाकार्ड पैसे भरण्याची पद्धत | Unpaid payment method in CDM

  • या पद्धतीने कुणाच्याही अकाऊंटमध्ये पैसे भरता येतात.
  • स्क्रीनवरील कॅश डिपॉझीट विदाऊट कार्ड वर क्लिक करा.
  • ज्या अकाऊंटमध्ये पैसे भरायचे आहे, तो नंबर मशिनला द्या.
  • त्यानंतर त्या अकाऊंट धारकाचे नाव मशिन दाखवेल.
  • नाव बरोबर असल्यास एंटर या शब्दावर क्लिक करा.
  • कॅश डिपॉझीट स्लॉट मध्ये पैसे ठेवा आणि कंटीन्यूवर क्लिक करा.
  • सीडीएम आपण ठेवलेले पैसे मोजेल आणि नोटांनुसार एकूण रकमेचे विवरण स्क्रीनवर सादर करेल.
  • ते विवरण योग्य असल्यास डिपॉझीट या शब्दावर क्लिक करा.
  • आपले पैसे जमा झाल्याचा संदेश आपल्याला स्क्रीनवर दिसेल आणि आपल्यास पावती मिळेल.

रोख ठेव मशीन (CDM) तोटे | Cash Deposit Machine (CDM) Disadvantages :

कॅश डिपॉझिट मशीन हे एक सेल्फ-सर्व्हिस बँकिंग मशीन आहे जे वापरकर्त्यांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट रोख जमा करण्याची परवानगी देते. सीडीएम सुविधा आणि कार्यक्षमता देतात, त्यांच्यात काही तोटे असू शकतात:
  • मर्यादित कार्ये: सीडीएम सामान्यत: रोख ठेवींवर लक्ष केंद्रित करतात आणि पैसे काढणे, निधी हस्तांतरण किंवा खाते चौकशी यासारख्या विस्तृत बँकिंग कार्ये देऊ शकत नाहीत.
  • रोख हाताळणी जोखीम: CDMs मध्ये रोख हाताळणीचा समावेश असल्याने, चुकीची गणना करणे यासारख्या त्रुटींचा धोका असतो. वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगणे आणि जमा केलेल्या निधीची अचूक मोजणी सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
  • मशीन उपलब्धतेवर अवलंबून: सीडीएमवर विसंबून राहणाऱ्या वापरकर्त्यांना मशीन्स सेवाबाह्य असल्यास किंवा तांत्रिक समस्या असल्यास गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. मशीनच्या उपलब्धतेवर अवलंबून राहिल्याने ही सेवा अगदी गॅरेंटेड काम करेलच असे नाही.
  • व्यवहार मर्यादा: CDM मध्ये रोख ठेवींसाठी व्यवहार मर्यादा असू शकतात. म्हणजेच एकावेळी जास्तीतजास्त किती रक्कम जमा होईल यावर बंधने असू शकतात. मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असलेल्या वापरकर्त्यांना अनेक व्यवहार करावे लागतील किंवा पर्यायी बँकिंग चॅनेल वापरावे लागतील.
  • सुरक्षा चिंता:कोणत्याही सेल्फ-सर्व्हिस बँकिंग मशीनप्रमाणे, चोरी किंवा फसवणूक होण्याचा धोका यासारख्या सुरक्षिततेच्या समस्या असू शकतात. म्हणीन विशेषत: वेगळ्या किंवा खराब प्रकाश असलेल्या ठिकाणीवापरकर्त्यांना सीडीएम वापरताना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.

निष्कर्ष ( Conclusion)-

कॅश डिपॉझीट मशिन सध्या विशिष्ट बँकांनी सुरू केले आहेत. बँकेत आपला पॅन क्रमांक नोंदलेला नसल्यास किंवा पॅन क्रमांक बँकेतील खात्याशी जोडलेला असल्याबाबत पैसे भरण्याबाबत वेगवेगळे नियम लागू आहेतं, याबाबत अधिक माहितीसाठी बँकेशी संपर्क साधावा किंवा सीडीम सेंटरवर याबाबत दर्शविलेले नियम वाचावे. सुरक्षित आणि सुरक्षित व्यवहार अनुभव सुनिश्चित करण्यासाठी कॅश डिपॉझिट मशीन वापरताना वापरकर्त्यांनी बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि सुरक्षा शिफारशींचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने

इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या